बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने ( Karnataka High Court ) मंगळवारी एका स्थानिक न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला आहे. या स्थानिक न्यायलयाने ट्विटरला एका कॉपीराइट प्रकरणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) यांचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.
कर्नाटक उच्च न्यायलयाने काय म्हटले - न्यायमूर्ती जी. नरेंद्र आणि पीएन देसाई यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षाने त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून उल्लंघन करणारे ट्विट काढून टाकावेत. आत्तापर्यंत त्यांच्या हमींच्या अधीन राहून आदेश बाजूला ठेवण्यात आला आहे. इतर अंतरिम अर्जांवर पुनर्विचार केला जाईल व सध्या आम्ही ते कापत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
कॉंग्रेसची उच्च न्यायलयात धाव - संगीत कॉपीराइट उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांची 'भारत जोडो यात्रा' हँडल तात्पुरते ब्लॉक करण्यासाठी ट्विटरला स्थानिक न्यायालयाने आदेश दिले होते. स्थानिक न्यायालयाने सोमवारी ट्विटरला त्याच्या प्लॅटफॉर्मवरून तीन लिंक काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या निर्णायाविरोधात कॉंग्रेसने मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायलयात धाव घेतली होती. काँग्रेसतर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील ए.एस. पोन्नण्णा यांनी या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.