कलबुर्गी (कर्नाटक) : आजकाल अनेक शेतकरी अधिक नफ्यासाठी फळे आणि भाजीपाला यांसारख्या फळबागांची लागवड करत आहेत. मात्र येथे एक शेतकरी आहे जो इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत खूपच वेगळा आहे. तो दीड एकर ओसाड जमिनीवर गुलाबाची लागवड करून चक्क लाखोंचे उत्पन्न कमावत आहे! (Gulab Farmer Earn Lakhs by growing rose). (Karnataka Gulab Farmer).
दररोज 2 ते 2.5 हजार रुपयांचे उत्पन्न : हनुमंता रेड्डी हे कलबुर्गी जिल्ह्यातल्या कमलापुरा तालुक्यातील दिनसी (के) गावचे रहिवासी आहेत. त्यांनी दीड एकर परिसरात बिजली, बुलेटसह विविध प्रकारच्या गुलाबाच्या फुलांची लागवड केली आहे. सध्या बहुतांश फुले फुललेली असून, ते कलबुर्गी व इतर बाजारपेठेत 100 ते 120 रुपये किलो दराने विकून दररोज सरासरी 2 ते 2.5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
पर्यायी नोकरीची कल्पना: हनुमंता रेड्डी यांनी केवळ दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते आधी ड्रायव्हर होते. खाजगी वाहन चालवणे आणि घर चालवणे अवघड झाले असताना पर्यायी नोकरीचा विचार करत होते. मग त्यांचा मित्र गुलाबशेतीत यशस्वी झाल्याचे कळताच त्यांनीही गुलाबाची लागवड करण्यास सुरुवात केली.
गुलाबासह रेशीम पीक : नरेगा योजनेच्या सुविधेचा लाभ घेत वयोवृद्धांनी गुलाबाचे पीक घेऊन आपले जीवन फुलवले आहे. आता हनुमंताने गुलाबासोबत झेंडूचे पीक घेणेही चालू केले आहे. तीन एकर जमिनीत त्यांनी रेशीमही पिकवले असून त्यामुळे त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे.