ETV Bharat / bharat

'कर्नाटक सरकार लग्नाच्या नावाखाली धर्मांतरणावर बंदीसाठी लवकरच कायदा करणार'

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे कन्नड आणि संस्कृती मंत्री सी. टी. रवी यांनी ट्विटरवर याबाबत सांगितले. 'जेव्हा जिहादी आमच्या बहिणींच्या सन्मानाला धक्का पोहोचवतील, तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही. धर्मांतरणाच्या कृतीत गुंतलेल्या प्रत्येकाला गंभीर आणि कठोर कारवाईचा सामना करावा लागेल.'

कर्नाटक लग्नासाठी धर्मांतरणावर बंदी न्यूज

author img

By

Published : Nov 5, 2020, 3:47 PM IST

बंगळुरू - कर्नाटक राज्य सरकार लग्नासाठी धर्मांतरणावर बंदी घालण्यासाठी लवकरच कायदा करेल, असे राज्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी म्हटले आहे. यासाठी रवी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भही दिला आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकचे कन्नड आणि संस्कृती मंत्री सी. टी. रवी यांनी ट्विटरवर याबाबत सांगितले. 'जेव्हा जिहादी आमच्या बहिणींच्या सन्मानाला धक्का पोहोचवतील, तेव्हा आम्ही गप्प बसणार नाही. धर्मांतरणाच्या कृतीत गुंतलेल्या प्रत्येकाला गंभीर आणि कठोर कारवाईचा सामना करावा लागेल.'

  • On lines of Allahabad High Court's order, Karnataka will enact a law banning religious conversions for the sake of marriage.

    We will not remain silent when Jihadis strip the dignity of Our Sisters.

    Any one involved in the act of conversion shall face severe & swift punishment.

    — C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) November 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - हॅकर्सनी गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला 100 हाय-प्रोफाइल लोकांवर हल्ला - मायक्रोसॉफ्ट

ते म्हणाले की, प्रस्तावित कायदा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या धर्तीवर असेल.

विशेष म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही 'लव्ह जिहाद'विरोधात प्रभावी कायदा आणण्याविषयी वक्तव्य केले होते. यादरम्यानच रवी यांनीही अशाच प्रकारचे विधान केले आहे.

आदित्यनाथ यांनीही आपली ओळख लपवून महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांना 'इशारा'ही दिला आहे. जर या लोकांनी (लव्ह जिहाद करणाऱ्यांनी) आपले मार्ग बदलले नाहीत, तर त्यांच्या अंत्यसंस्कार मिरवणुका काढल्या जातील, असे आदित्यनाथ म्हणाले होते.

हेही वाचा - सैन्यामध्ये कुशल मनुष्यबळासाठी जवानांचे निवृत्ती वय वाढवण्याचा प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.