ETV Bharat / bharat

Karnataka Election Result 2023 : कर्नाटक काँग्रेस नेत्यांमध्ये लागली मुख्यमंत्री पदाची शर्यत, कोणाच्या गळ्यात पडणार माळ ? - माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बनण्याची शर्यत सुरू झाली आहे. काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांमध्ये असलेले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे.

Karnataka Election Result 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 13, 2023, 2:23 PM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार काँग्रेस पक्षाला बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांमध्येही स्पर्धा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्रने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर दावा ठोकला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र यांनी माझ्या वडिलांना हे पद मिळावे, असे सांगितले. त्यामुळे काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्री पदाची शर्यत सुरू झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकच्या हितासाठी वडिलांना करा मुख्यमंत्री : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. वडील सिद्धरामय्या यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवणे राज्याच्या हिताचे असेल, असे त्यांचे पुत्र यतिंद्र यांनी सांगितले. यासोबतच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण सर्वजण काहीही करायला तयार आहोत. मात्र कर्नाटकच्या हितासाठी आपल्या वडिलांना मुख्यमंत्री बनवायला हवे, असेही ते म्हणाले.

काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याची गरज नाही : काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही. काँग्रेस पक्ष कर्नाटक निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकणार आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांचे पुत्र आणि डीके शिवकुमार यांनी केला आहे. वडील सिद्धरामय्या ही विधानसभा निवडणूक वरुणा मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहेत. मुलगा या नात्याने वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा आहे. राज्याचा रहिवासी असल्याने वडिलांनी मुख्यमंत्री होणे हे राज्याच्या हिताचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांचा मागील कार्यकाळ अतिशय चांगला होता. नागरिक त्यांच्या कामाचे कौतुक करतात. त्यांच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्थेची आठवण ठेवतात असेही ते यावेळी म्हणाले. निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस पक्ष सुमारे 120 जागांवर आघाडीवर आहे. जर या ट्रेंडचे निकालात रुपांतर झाले तर काँग्रेस कर्नाटकात स्वबळावर सत्तेत येईल. राज्यात बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे.

हेही वाचा -

  1. MES Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 निकालात सीमावर्ती भागात एमईएस उधळणार गुलाल
  2. Karnataka election big fights : काँग्रेसचा 45 जागांवर विजय, मुख्यमंत्रीपदासाठी ठरवला फॉर्म्युला
  3. Grand verdict of Karnataka Live Update : कर्नाटकात ८९ जागांचे निकाल जाहीर, काँग्रेस ५६ तर भाजपचा २६ ठिकाणी विजयी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.