बेंगळुरू : कर्नाटकात पक्षाची सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने पाच प्रमुख आश्वासने दिली होती. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, कर्नाटक कॉंग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील आणि जाहीरनामा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. जी परमेश्वरा यांनी मिळून राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आणि पाच आश्वासने जाहीर केली. त्याला पाठिंबा देत मतदारांनी काँग्रेसला बहुमत दिले.
- पहिली हमी : कॉंग्रेसने राज्यात प्रति घर 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. बेळगावातील चिक्कोडी येथे आयोजित प्रजाध्वनी यात्रेच्या उद्घाटन समारंभात काँग्रेसने ही घोषणा केली. केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि बीके हरिप्रसाद यांनी ही घोषणा केली.
- दुसरी हमी : दुसरी घोषणा काँग्रेसने बेंगळुरू येथील पॅलेस मैदानावर आयोजित महिला परिषदेत केली. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत या आश्वासनाची घोषणा करण्यात आली. राज्यातील सर्व महिलांना दरमहा 2000 रुपये मोफत देण्याची हमी कॉंग्रेसने दिली आहे.
- तिसरी हमी : मोफत तांदळाची तरतूद हे काँग्रेसने जाहीर केलेले तिसरे आश्वासन आहे. कॉंग्रेसने 10 किलोपर्यंत मोफत तांदूळ वाटण्याची घोषणा केली आहे. ही योजना बीपीएल कार्डधारकांसाठी लागू असेल.
- चौथी हमी : राहुल गांधी यांनी बेळगाव येथे झालेल्या युवा क्रांती संमेलनात पक्षाचे चौथे आश्वासह जाहीर केले. पक्ष सत्तेवर आल्यास बेरोजगार पदवीधरांना युवानिधी नावाच्या योजनेत आर्थिक मदत देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. युवा निधी योजनेंतर्गत बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये आणि पदविका पदवीधारकांना 1,500 रुपये दरमहा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- पाचवी हमी : सत्तेत येण्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे ही राहुल गांधींची कर्नाटकसाठी 5 वी सर्वात मोठी हमी आहे.
आणखी दोन घोषणा : हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी काँग्रेसने आणखी दोन घोषणा केल्या होत्या. अंगणवाडी सेविकांच्या पगारात 15 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची काँग्रेसची सहावी घोषणा आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आशा वर्कर्सच्या पगारात 8,000 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली होती. खानापूर येथे झालेल्या परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
सातवी घोषणा : सातवी घोषणा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी अर्सिकेरे येथील शेतकऱ्यांसाठी खास 'कृषी निधी' योजना जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी निधी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांच्या अर्थसंकल्पात 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम बाजूला ठेवणे. दरवर्षी अर्थसंकल्पातून 30 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जातील. तसेच पक्षाने नारळ आणि सुपारी उत्पादकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ आणि दूध अनुदानात 5 रुपयांवरून 7 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा :
- Devendra Fadnavis on Karnataka Result : कर्नाटक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रावर...
- Sharad Pawar Reaction On Karnataka : कर्नाटकात भाजपला मतदारांनी धडा शिकवला - शरद पवार
- Karnataka Election Result : कर्नाटकातील निकालावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया ; जयराम रमेश म्हणाले - जनतेने मोदींना नाकारले