UPDATE :
बेळगाव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी पाच ४६ टक्के मतदान
- बेळगाव ग्रामीण १४,२४५० (५८.३६ टक्के)
- बेळगाव दक्षिण १०,८९६२ (४४.८४ टक्के)
- बेळगाव उत्तर -१०,४०२५ (४२.८८ टक्के)
बेळगाव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी पाच ४६ टक्के मतदान
- बेळगाव ग्रामीण ५५.११ टक्के
- बेळगाव दक्षिण ४२.३० टक्के
- बेळगाव उत्तर ४१.५७ टक्के
बेळगाव लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ३५.५५ टक्के मतदान
- बेळगाव ग्रामीण ५२.७४ टक्के
- बेळगाव दक्षिण ३१.९५ टक्के
- बेळगाव उत्तर ३२.५ टक्के
बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी एक वाजेपर्यंत २२.४९ टक्के मतदान
बेळगाव ग्रामीणमध्ये ३६.२७ टक्के मतदान
- बेळगावी लोकसभा पोटनिवडणूक - सकाळी अकरा वाजेपर्यंत १३.१३ टक्के मतदान
- बसवकल्याण विधानसभा पोटनिवडणूक - सकाळी अकरा वाजेर्यंत १९.४८ टक्के मतदान.
- मसकी विधानसभा पोटनिवडणूक - सकाळी अकरा वाजेपर्यंत १९.३० टक्के मतदान.
UPDATE :
- बेळगावीमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.४७ टक्के मतदानाची नोंद.
- बसवकल्याणमद्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.४६ टक्के मतदानाची नोंद.
- मसकीमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.४७ टक्के मतदानाची नोंद.
बंगळुरू : सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगावमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून, सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मतदान पार पडत आहे. तर, शेवटचा एक तास कोविड रुग्णांना मतदान करण्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे.
याठिकाणी काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी, भाजपाकडून माजी खासदार अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या तिघांमध्येच मुख्य लढत असणार आहे.
सकाळी मंगला अंगडी आणि त्यांच्या मुलींनी मतदान केले. तर, शुभम शेळके यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
मराठी भाषिकांची मते निर्णायक असणार..
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 6 ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत तर 2 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यापूर्वी याठिकाणी महाराष्ट्रात एकीकरण समितीचेच जास्त आमदार पाहायला मिळायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्हनगुत्ती प्रकरणासह बेळगाव महापालिकेसमोर लावण्यात आलेल्या वादग्रस्त झेंड्याच्या विरोधात मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या गाडीवरसुद्धा कन्नड संघटनांनी हल्ला केला होता. त्यानंतर सातत्याने या सीमाभागात वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभेच्या या पोटनिवडणुकीत नेमके काय होणार? मराठी भाषिक कोणाला मत देणार हेच पाहावे लागणार आहे.
आणखी दोन पोटनिवडणुकांसाठी मतदान..
दरम्यान, आज कर्नाटकात बेळगावसह आणखी दोन जागांसाठीही मतदान पार पडत आहे. या सर्व ठिकाणी मिळून सुमारे २२ लाख लोक मतदान करतील. आमदार बी. नारायण राव यांचे निधन झाल्यामुळे बसवकल्याणमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. तर, मसकीचे आमदार प्रतापगौडा पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे त्याठिकाणीही पोटनिवडणुका पार पडत आहेत.
या सर्व पोटनिवडणुकांसाठी २ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.