ETV Bharat / bharat

Karnataka Election Congress List: कर्नाटक निवडणूक, काँग्रेसची ४३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, भाजपातून आलेल्या लक्ष्मण सावदी यांना उमेदवारी

author img

By

Published : Apr 15, 2023, 4:31 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज ४३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यात भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना पक्षाने अथणी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

KARNATAKA ASSEMBLY ELECTIONS 2023: Congress 3rd list release
कर्नाटक निवडणूक, काँग्रेसची ४३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, भाजपातून आलेल्या लक्ष्मण सावदी यांना उमेदवारी

नवी दिल्ली : कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकरिता काँग्रेसने आज 43 उमेदवारांची नावे असलेली तिसरी यादी जाहीर केली. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार कोथुर्जी मंजुनाथ हे कोलार विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या विधानसभा निवडणुकीत वरुणासोबत या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वरुणा विधानसभा मतदारसंघातून त्यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

सावदी यांना तिकीट: भारतीय जनता पक्ष (भाजप) सोडून शुक्रवारी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना अथणी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. 6 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 41 उमेदवारांचा समावेश होता आणि एक उमेदवार सर्वोदय कर्नाटक पक्षाचा होता. सर्वोदय कर्नाटक पक्षाचे दर्शन पुट्टन्नैया यांना मेलुकोट विधानसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित करण्यात आले. कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 25 मार्च रोजी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वरुण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

KARNATAKA ASSEMBLY ELECTIONS 2023: Congress 3rd list release
काँग्रेसची उमेदवार यादी १

मतदारसंघांवर ठेवणार लक्ष: काँग्रेसने आतापर्यंत एकूण 207 उमेदवार जाहीर केले आहेत. आता त्यांना 58 जागांसाठी आणखी उमेदवार जाहीर करायचे आहेत. कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे. दुसरीकडे, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एआयसीसीच्या 66 निरीक्षकांना नियुक्त केले आहे. हे पर्यवेक्षक आपापल्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवतील आणि केंद्रीय मुख्यालयाच्या संपर्कात असतील.

काँग्रेस उमेदवार यादी २

६६ निरीक्षकांची नियुक्ती: निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या निरीक्षकांची नियुक्ती करण्याची पक्षाची जुनी प्रथा आहे. AICC च्या 66 निरीक्षकांपैकी, माजी PCC प्रमुख एन रघुवीरा रेड्डी, माजी मुंबई युनिट प्रमुख संजय निरुपम, खासदार बेनी बेहानन, खासदार कार्ती चिदंबरम आणि खासदार जोथिमणी यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांना एकट्या राजधानी बेंगळुरूमध्ये तैनात करण्यात आले आहे. बेंगळुरू शहराच्या अंतर्गत जवळपास 25 विधानसभेच्या जागा आहेत. याचा अर्थ एका निरीक्षकासाठी पाच विधानसभा जागा आहेत.

हेही वाचा: केंद्राला झुकावेच लागले, सीएपीएफ परीक्षा होणार १३ भाषांमधून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.