ETV Bharat / bharat

PM Modi Visit To Karnataka: निवडणूक आली, पंतप्रधान मोदींचा आज कर्नाटक दौरा, विशाल सभेला करणार संबोधित

सुमारे 4250 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मेट्रो मार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळे बेंगळुरूमधील प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

Karnataka Assembly Election 2023 PM Modi visits Karnataka today address public meeting in Davangere
निवडणूक आली, पंतप्रधान मोदींचा आज कर्नाटक दौरा, विशाल सभेला करणार संबोधित
author img

By

Published : Mar 25, 2023, 9:35 AM IST

बेंगळुरू (कर्नाटक): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक राज्याला भेट देणार असून, या वर्षातील त्यांचा हा सातवा दौरा असेल. यादरम्यान, पंतप्रधान विविध अधिकृत कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) द्वारे आयोजित एका विशाल जाहीर सभेला संबोधित करतील. येत्या काही दिवसांत निवडणूक आयोग मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा कार्यक्रम जाहीर करेल.

मोदी चिक्कबल्लापूर येथे 'श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च' चे उद्घाटन करतील आणि नंतर ते बेंगळुरू मेट्रोच्या व्हाईटफील्ड (कडुगोडी) कृष्णराजपुरा मेट्रो लाईनचे उद्घाटन करतील आणि ट्रेनचा प्रवास देखील करतील. त्यानंतर ते जिल्हा मुख्यालय असलेल्या दावणगेरे येथे जातील आणि भाजपच्या 'विजय संकल्प यात्रे'च्या समारोपाच्या निमित्ताने जाहीर सभेला संबोधित करतील. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झाल्यापासून पक्षाची ही पहिलीच बैठक आहे, ज्यात पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

दावणगेरे येथील भाजपचे खासदार जी एम सिद्धेश्वर म्हणाले की, या रॅलीमध्ये एकूण 10 लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. एकट्या दावणगेरे जिल्ह्यातून सुमारे तीन लाख लोक सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दावणगेरे येथे आधीच भगव्या रंगाची रंगरंगोटी करण्यात आली असून, जीएमआयटी कॉलेजच्या शेजारी ४०० एकर जागेत मंडप उभारण्यात आला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश तेंगीनाकई यांनी दावा केला की, राज्यभरातून चार वेगवेगळ्या दिशांनी खास तयार केलेल्या वाहने किंवा 'रथ'मधून निघालेल्या चार 'विजय संकल्प यात्रा' यशस्वी झाल्या आहेत.

ते म्हणाले की, या यात्रेत एकूण 5,600 किलोमीटरचे अंतर कापण्यात आले होते, ज्यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते. आम्ही 224 मतदारसंघात पोहोचलो. मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली असून, 400 काउंटर उघडण्यात येणार असल्याचे पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ते म्हणाले की, एक हजार स्वयंपाकी नेमण्यात आले असून पार्किंगसाठी 44 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या दावणगेरेमध्येच एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर भाजपचे स्थानिक नेते विधानसभा निवडणुकीपूर्वी या भागात आणखी एक मोठी जाहीर सभा आयोजित करण्यासाठी पक्षावर दबाव आणत होते. पंतप्रधान शनिवारी श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (SMSIMSR) चे उद्घाटन करतील. SMSIMSR ची स्थापना श्री सत्य साई विद्यापीठाने सत्य साई व्हिलेज, मुद्देनहल्ली, चिक्कबल्लापूर येथे मानवी उत्कृष्टतेसाठी केली आहे.

हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, पगारातील पैशात घसघशीत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.