ETV Bharat / bharat

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक खुला प्रचार संपला, उमेदवार दारोदारी जाऊन करणार प्रचार

कर्नाटक निवडणुकीचे बिगूल वाजल्यापासून विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार प्रचार करत आहेत. आता मात्र सोमवारी खुल्या प्रचाराचा कालावधी संपला आहे. सोमवारी सायंकाळपासून ते मंगळवारी सायंकाळपर्यंत उमेदवारांना दारोदार जाऊन प्रचार करता येणार आहे. 10 मे रोजी सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे.

Karnataka Assembly Election 2023
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 9, 2023, 8:50 AM IST

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी खुला प्रचार करण्याची मुदत सोमवारी संपली आहे. त्यामुळे उमेदवार आज सायंकाळपर्यंत मतदारांच्या दारोदारी जाऊन प्रचार करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आज उमेदवारांसाठी कसरतीचा दिवस आहे. विविध पक्षांनी तब्बल 40 दिवस कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला आहे. सोमवारी सहा वाजतापर्यंत ते मंगळवारी सायंकाळपर्यंत दारोदारी जाऊन प्रचार करण्यात येणार आहे.

उद्या सकाळी होणार मतदानाला सुरुवात : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील २२४ मतदार संघात उद्या सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानानंतर 2 दिवसानंतर 13 मे रोजी उमेदवारांचे राजकीय भवितव्य जाहीर होणार आहे.

48 तास खुला प्रचार करण्यास बंदी : कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या जोरात सुरू आहे. निडणुकीचा प्रचार थांबला आहे. मात्र निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेमुळे निवडणुकीआधी 48 तासांच्या कालावधीत सार्वजनिक सभा, खुला प्रचार करण्यास मनाई आहे. या कालावधीत आचारसंहिता कडक करण्यात आली असून राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रसारमाध्यमे यांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

दारोदारी होणार प्रचार : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खुल्या प्रचाराची मुदत सोमवारी संपली आहे. मात्र उमेदवार दारोदारी जाऊन प्रचार करू शकतात. मतदारसंघातील उमेदवार आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करू शकणार असल्याने आज मतदारांना आश्वासनाची खैरात वाटली जाण्याची शक्याता आहे.

मतदार संघात कलम 144 लागू : निवडणूक असलेल्या मतदार संघांमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (PRPC) च्या कलम 144 अन्वये मतदान संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत बेकायदेशीर जमावास मनाई करण्यात आली आहे. 144 प्रतिबंधात्मक आदेश प्रतिबंधित क्षेत्रामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास परवानगी दिली जाणार नाही. परंतु घरोघरी प्रचारासाठी 48 तासांच्या आत मतदारांच्या दारोदार भेट देण्यावर कोणतेही बंधन नाही.

झिरो अवर म्हणजे काय : झिरो अवर म्हणजे बाहेरील राजकीय व्यक्तींसह आणि मतदार संघाचे मतदार नसलेल्या व्यक्तींनी खुले प्रचार कालावधी संपल्यानंतर ४८ तासांच्या आत मतदार संघात राहू नये. अशा व्यक्तींनी प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर लगेचच मतदारसंघातून निघून जावे.

मतदार संघात दारूबंदी आदेश लागू : मतदान पूर्ण होईपर्यंत मतदार संघात दारूबंदी घोषित करण्यात येते. 8 मे रोजी सायंकाळी 6 ते 10 मे रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मद्यविक्रीला कर्नाटकात बंदी आहे. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदी घोषित करण्याचे आदेश जारी केले आहेत. मतदान संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत कोणतेही लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आलेली नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

माध्यमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे : राजकीय पक्ष आणि उमेदवारांना राज्य जिल्हा स्तरावरील समितीने काही बंधने घालून दिली आहेत. तसेच ते माध्यमांनाीह घालून देण्यात आली आहेत. माध्यमांनी 9 आणि 10 मे दरम्यान कोणतीही जाहिरात प्रकाशित करू नये. अशी जाहिरात प्रकाशित केल्यास माध्यम संस्थादेखील कारवाईस पात्र ठरणार आहे.

हेही वाचा -

Election Commission Notice To Sonia Gandhi : कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण

Jio Compulsory For Government Employee : गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना

Karnataka Election 2023 : 'कर्नाटकात मुस्लिम आरक्षण वाढवण्यासाठी काँग्रेस कुणाच्या आरक्षणाला कात्री लावणार?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.