नवी दिल्ली - जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विद्यमान नेते कन्हैया कुमार यांचे ट्विटर अकाउंट शनिवारी (30 जानेवारी) हॅक झाल्याची माहिती आहे. याबाबत कुणाल कामराने माहिती दिली आहे. कन्हैयाचे खाते हॅक करण्यात आले आहे. कामराने कन्हैया कुमारच्या शेवटच्या ट्विटचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे. यात कन्हैया यांनी गोडसेच्या समर्थकांवर कडक टीका केली होती.
कन्हैयाचे शेवटचे ट्विट काय होते ?
गोडसे भक्तानो ऐका, बंद खोलीत तुम्ही त्या दहशतवाद्यांची पुजा करा. सार्वजनिकरित्या तर तुमच्या प्रधानालाही गांधीजींसमोर झुकावे लागते, असे टि्वट कन्हैया कुमारने महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीच्या दिवशी केले होते. त्यानंतर त्यांचे टि्वटर खाते हॅक झाले.
कन्हैया कुमार नावाचे नवीन खाते -
या घटनेनंतर कन्हैया कुमारच्या नावाने एक नवीन खाते ट्विटरवर सुरू झाले आहे. हे खाते कन्हैया कुमार स्वत: किंवा इतर कोणी चालवत आहे, हे अद्याप समजू शकले नाही. या खात्यावर पूर्वीची काही ट्विटसही जोडली गेली आहेत. या खात्यावरून त्यांनी मोदींवर टीका केली आहे. माझे खात हॅक करून शेतकऱ्यांना रोखणार का मोदी काका, असे टि्वट करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या टि्वटमध्ये भाजपाच्या आयटीसेलवर टीका केली आहे. मी या आयटी सेलसारखे भक्त आणि अंध लोक कधीच पाहिले नाहीत. यांच्याविरोधात बोलल्यास कुणालाही नुकसान पोहचवू शकतात.