चेन्नई - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकींचा निकाल लागला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतील. कमला हॅरिस यांच्या विजयानंतर भारतातील तामिळनाडूच्या थुलसेंद्रपुरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी दारासमोर रांगोळ्या काढल्या असून कमला हॅरिस यांच्या मामांनीही आनंद व्यक्त केला आहे. कमला यांचा विजय होणार, याबद्दल मला खात्री होती. मी फक्त अंतिम निकालाची वाट पाहत होतो, असे ते म्हणाले.
-
Tamil Nadu: People in Thulasendrapuram, the native village of US Vice President-elect Kamala Harris celebrate her #USElection win by putting up posters, distributing sweets and burning firecrackers. https://t.co/pmd7P3xkjI pic.twitter.com/Aa7mVVQIwP
— ANI (@ANI) November 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tamil Nadu: People in Thulasendrapuram, the native village of US Vice President-elect Kamala Harris celebrate her #USElection win by putting up posters, distributing sweets and burning firecrackers. https://t.co/pmd7P3xkjI pic.twitter.com/Aa7mVVQIwP
— ANI (@ANI) November 8, 2020Tamil Nadu: People in Thulasendrapuram, the native village of US Vice President-elect Kamala Harris celebrate her #USElection win by putting up posters, distributing sweets and burning firecrackers. https://t.co/pmd7P3xkjI pic.twitter.com/Aa7mVVQIwP
— ANI (@ANI) November 8, 2020
कमला हॅरिस यांचा विजय झाल्यावर राज्यमंत्री आर. कामाराज यांनी थुलसेंद्रपुरमधील मंदिरात प्रार्थना केली. थुलसेंद्रपुरमधील हे कमला यांच्या आजोबांचे (आईचे वडिल) मूळ गाव आहे. गावकऱ्यांनी आतषबाजी करत कमला यांचा विजय साजरा केला. रस्त्यांवर पोस्टर लावून आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. निकालापूर्वी कमला यांच्या विजयासाठी तामिळनाडूतील मूळ गावी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आल्याचे बालचंद्रन यांनी सांगितले होते.
भारताशी निकटचे नाते -
उपराष्ट्राध्यपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असून त्यांचे भारताशी निकटचे नाते आहे. कमला हॅरिस भारतीय- आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफॉर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. त्यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या तामिळनाडूतील होत्या. शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या. श्यामला यांचे पती आफ्रिकन वंशाचे होते. श्यामला गोपालन या नावाजलेल्या कॅन्सर संशोधक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या होत्या. परदेशात राहत असताना आपल्या मुलांची नाळ भारतासोबत जुळलेली असावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.