ETV Bharat / bharat

Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : ज्योतिरादित्य सिंधियांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, संकुचित मानसिकतेमुळं...

Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. जी20 परिषद यशस्वी झाल्यानं काही संकुचित मानसिकतेच्या नेत्यांचा जळफळाट झाल्याचा हल्लाबोल ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला.

Jyotiraditya Scindia On Rahul Gandhi
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 9:42 AM IST

इंदूर : जी 20 परिषदेतून जागतिक स्तरावर भारत देश एक उभरता तारा म्हणून पुढं येत आहे. जागतिक स्तरावरील नेत्यांनी भारतानं केलेल्या जी20 परिषदेचं ( G20 Summits ) कौतुक केलं. मात्र काही संकुचित मानसिकतेच्या जळकुट्या पक्षाचा चांगलाच जळफळाट यामुळे झाला. त्यामुळेच पुन्हा विदेशात जाऊन भारतावर टीका केल्याचा हल्लाबोल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. मात्र जनता त्यांना आगामी निवडणुकीत तिसऱ्यांदा धडा शिकवेल, असंही मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले.

  • #WATCH | Indore, Madhya Pradesh: On Rahul Gandhi's statement, Union Minister Jyotiraditya Scindia says, "Some parties get restless when India shines on a global platform... Some people have the mentality of demeaning others instead of improving themselves. India organised a… pic.twitter.com/enXAEi5q5O

    — ANI (@ANI) September 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं जी20 परिषदेचं यशस्वी आयोजन केलं आहे. त्यामुळे भारत देश जागतिक पातळीवर उभरता तारा म्हणून पुढं येत आहे. मात्र काही लोकांची मानसिकता स्वत:ला सुधारण्याऐवजी इतरांना बदनाम करण्याची असते. त्यामुळेच भारताची प्रगती पाहुन त्यांचा जळफळाट होतो, असंही ज्योतिरादित्य सिंधिया यावेळी म्हणाले. जी 20 परिषदेत आलेल्या जागतिक नेत्यांनी 'भारत दर्शन' केलं. त्यांनी भारताची आर्थिक आणि अध्यात्मिक शक्ती पाहिली. मात्र काही संकुचित मानसिकता असलेल्या पक्षांना जी20 परिषद यशस्वी झाल्याचा हेवा वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी पुन्हा विदेशी भूमित जाऊन भारतावर टीका केली. मात्र भारतीय जनतेनं आता हे ओळखलं आहे. त्यामुळे जनता त्यांना तिसऱ्यांदा धडा शिकवेल, असा हल्लाबोलही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी यावेळी केला.

राहुल गांधींनी काय केली होती टीका : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदेशात गेल्यानंतर पुन्हा देशातील स्थितीवर भाष्ट केलं आहे. फ्रान्सला राहुल गांधी यांनी भारतात अशांत वातावरण असल्याची टीका केली होती. भाजपाला हिंदू धर्माशी काहीही देणंघेणं नसून कसंही करुन त्यांना सत्ता हस्तगत करायची आहे. त्यामुळे भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते, अशी जहरी टीका राहुल गांधी यांनी केली होती. मात्र भारतातील अशांत वातावरणातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आम्ही 'इंडिया' आघाडी केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. कोल्हापूरात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार याचा ठाम विश्वास - ज्योतिरादित्य शिंदे
  2. Jyotiraditya Scindia in Kolhapur ज्योतिरादित्य सिंधिया यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाला भेट देऊन केले अभिवादन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.