ETV Bharat / bharat

Journalist Sabrina Siddiqui : मोदींना प्रश्न विचारणारी पत्रकार ट्रोल, अमेरिकेने केला निषेध, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पत्रकार सबरीन सिद्दीकी यांनी भारतातील अल्पसंख्याकांवरील भेदभावावर प्रश्न विचारला होता. मात्र, सिद्दीकी यांच्या या प्रश्नावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. प्रकरण इतके वाढले की अमेरिकेलाही या संपूर्ण प्रकरणावर अधिकृतपणे प्रतिक्रिया द्यावी लागली.

Journalist Sabrina Siddiqui
पत्रकार सबरीन सिद्दीकी
author img

By

Published : Jun 27, 2023, 4:11 PM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका महिला पत्रकाराने भारतातील अल्पसंख्याकांविरुद्ध होत असलेल्या कथित भेदभावाबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाला पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने उत्तर दिले त्याचे सर्वजण कौतुक करत होते. मात्र, त्या महिला पत्रकाराला या प्रश्नावरून सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले. यावर आता अमेरिकेनेही प्रतिक्रिया दिली आहे. सबरीना सिद्दीकी असे त्या महिला पत्रकाराचे नाव आहे. ती वॉशिंग्टनमध्ये राहते. सबरीनाचा प्रश्न भारतातील कथित भेदभाव आणि मुस्लिमांच्या मानवी हक्कांशी संबंधित होता. या प्रश्नावर मोदींनी काय उत्तर दिले, त्याआधी या संपूर्ण प्रकरणावर व्हाईट हाऊसची काय प्रतिक्रिया होती, हे जाणून घेऊया.

ऑनलाइन ट्रोलिंगवर अमेरिकेची प्रतिक्रिया : एनबीसीची रिपोर्टर केली ओ'डोनेलने सोमवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींना ऑनलाइन ट्रोलिंगबाबत प्रश्न विचारला. यावर प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी म्हणाले की, आम्हालाही या ट्रोलिंगची माहिती आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. ते कोणत्याही स्वरूपात अस्वीकार्य आहे. हे कोणत्याही प्रकारे लोकशाहीच्या तत्त्वांशी जुळत नाही, असे किर्बी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, जर तुम्हाला यावर अधिक उत्तरे हवी असतील तर तुम्ही पंतप्रधानांना विचारा. नाहीतर तुम्ही लिहायला मोकळे आहात. मला या विषयावर अधिक काही बोलायला आवडणार नाही.

  • हमें अफसोस है कि PM मोदी से सवाल करने की वजह से एक महिला पत्रकार को प्रताड़ना झेलनी पड़ी।

    हम इसकी निंदा करते हैं।

    सनद रहे कि 9 साल में पहली बार PM मोदी ने प्रेस कॉन्फ्रेंस की और उनसे सवाल पूछा गया था।

    इस एक सवाल ने प्रेस की स्वतंत्रता के खोखले दावे को उधेड़ कर रख दिया। pic.twitter.com/A2celzpG7n

    — Congress (@INCIndia) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदींनी दिले होते हे उत्तर : संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान सबरीनाने पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले होते की, तुम्ही लोकशाहीवर प्रश्न विचारत आहात याचे मला आश्चर्य वाटते, कारण लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे. भारतात कोणाशीही भेदभाव केला जात नाही. पंतप्रधान म्हणाले की, लोकशाही भारताच्या शिरपेचात आहे. आम्ही लोकशाहीने जगतो, आमचे सरकार लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित संविधानावर चालते. सरकारने दिलेल्या सवलतींचा फायदा सर्वांना होतो. धर्म, जात, वय किंवा इतर कोणत्याही आधारावर कोणताही भेदभाव होत नाही.

  • Since some have chosen to make a point of my personal background, it feels only right to provide a fuller picture. Sometimes identities are more complex than they seem. pic.twitter.com/Huxbmm57q8

    — Sabrina Siddiqui (@SabrinaSiddiqui) June 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोशल मीडियावर ट्रोल झाली सबरीना : पंतप्रधान मोदींच्या या प्रेस कॉन्फरन्सनंतर सबरीना सिद्दीकीला सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही लोकांनी अँटी इंडिया, तर काहींनी प्रो-पाकिस्तानीही म्हटले. ती मुस्लीम असल्याने असे प्रश्न विचारत असल्याचे कोणीतरी म्हटले. या ट्रोलिंगमुळे त्रासलेल्या सबरीनाने तिचा जुना फोटो पोस्ट केला. यामध्ये तिचे वडील भारताची जर्सी घालून होते. एका सामन्यात ते भारताला सपोर्ट करत होते. तर आणखी एका फोटोमध्ये, सबरीना स्वतःही भारताची जर्सी परिधान करताना दिसत आहे.

सबरीनाच्या समर्थनात काँग्रेस : काँग्रेस पक्षाने सबरीनाच्या ट्विटला उत्तर देत मोदी सरकारला पिंजऱ्यात उभे केले. काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, एका महिला पत्रकाराला पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यासाठी त्रास सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिलनेही सबरीनाचे समर्थन करताना म्हटले की, पत्रकार असल्याने सबरीनाने प्रश्न विचारला होता. या आधारावर कोणाला ट्रोल केले जाऊ नये. हिंदुस्तान टाइम्सने आपल्या एका लेखात लिहिले आहे की, सबरीना सर सय्यद अहमद खान यांच्या कुटुंबातील आहे. बायडन यांच्या युक्रेन भेटीदरम्यान सबरीना त्यांच्यासोबत होती. ती वॉशिंग्टनमध्ये राहते.

हेही वाचा :

  1. Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' ने सन्मानित
  2. Biden Gift To Modi : 'AI भविष्य आहे', बायडन यांनी मोदींना भेट दिलेल्या टी-शर्टवर काय लिहिले आहे?, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.