ETV Bharat / bharat

जेएनयूतील विद्यार्थ्यांकडून ग्रंथालयाची तोडफोड; कर्मचार्‍यांना मारहाण - Jnu news

जेएनयू विद्यार्थ्यांच्या एका गटावर ग्रंथालयात तोडफोड केल्याचा आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जेएनयू प्रशासनाने आरोपी विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जेएनयू
जेएनयू
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:25 PM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या एका गटावर ग्रंथालयात तोडफोड केल्याचा आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जेएनयू प्रशासनाने आरोपी विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 8 जून रोजी घडली असून विद्यापीठाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथपाल व विद्यार्थी यांच्यात बैठकही झाली.

विद्यार्थ्यांच्या एका गटाने सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण केली. बी आर आंबेडकरांनी लायब्ररीच्या शेजारील काचेचा दरवाजा तोडला. आरोपींनी 8 जून रोजी इमारतीच्या मुख्य ग्रंथालयात प्रवेश करत कब्जा केला, असे जेएनयू प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

ग्रंथालय होते बंद...

जेएनयूच्या एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, की ग्रंथालय बरेच दिवस उघडलेले नव्हते. यामुळे पीएचडी विद्यार्थ्यांमध्ये निराशा होती. त्यामुळे विद्यार्थी ग्रंथालयात दाखल झाले होते. मात्र, कोणताही हिंसाचार झाला नाही.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया...

विद्यार्थ्यांनी या घटनेविषयी ट्विटर व इतर सोशल मीडियावर पोस्ट केले की, महामारीच्या वेळी प्रशासनाने ग्रंथालय बंद केले होते. विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय ग्रंथालय त्वरित पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली होती. घटनेच्या पार्श्वभूमीवर जेएनयू कॅम्पसमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.