ETV Bharat / bharat

JK Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान; सैन्य दलाच्या जवानांनी काश्मीर पंडिताच्या हत्येचा काढला वचपा - जम्मू काश्मीर पोलीस

JK Encounter : जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांसोबत भारतीय सुरक्षा दलातील जवानांची चकमक उडाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. अद्यापही शोपियानमधील अळसीपोरा इथं चकमक सुरू असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

JK Encounter
JK Encounter
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 10:43 AM IST

Updated : Oct 10, 2023, 11:10 AM IST

श्रीनगर JK Encounter : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सैन्य दलातील जवानांची चकमक उडाली आहे. या चकमकीत सैन्य दलातील जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मारिफत मकबूल आणि जाझिम फारुक उर्फ अबरार असं ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील अळसीपोरा इथं घडली. ही कारवाई राष्ट्रीय रायफल्सच्या 44 तुकडीतील जवान, केंद्रीय राखिव पोलीस दलातील 178 बटालियन आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केली.

दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान : अळसीपोरा परिसरातील एका घरात दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यावेळी राष्ट्रीय रायफल्सच्या 44 तुकडीतील जवान, केंद्रीय राखिव दलातील 178 बटालियन आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी एका घरातून जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांच्या जवानांना यश आलं.

काश्मीरी पंडिताच्या खुनाचा काढला वचपा : काश्मीरी पंडित संजय शर्मा यांचा काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी निर्घृण खून केला होता. संजय शर्मा यांच्या खुनानंतर काश्मीर खोऱ्यात मोठी दहशत परसली होती. विशेष म्हणजे काश्मीरचं विभाजन करुनही पंडितांची हत्या रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला होता. संजय शर्मा यांच्या हत्येत जाझिम फारुक उर्फ अबरार हा मास्टरमाईंड होता, असा दावा सुरक्षा दलानं केला होता. मात्र भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जाझिम फारुक उर्फ अबरार याला कंठस्नान घातल्याची माहिती जम्मू काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी वृत्तसंस्थेला दिली.

'लष्कर ए तोयबा'त होते दहशतवादी : शोपियान जिल्ह्यातील अळसीपोरा इथं सुरक्षा दलानं दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या चकमकीत ठार झालेले मारिफत मकबूल आणि जाझिम फारुक उर्फ अबरार हे दोन्ही दहशतवादी स्थानिक होते, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. हे दोन्ही दहशतवादी 'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेत कार्यरत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिसरात मारिफत मकबूल आणि जाझिम फारुक उर्फ अबरार या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप चकमक सुरू असून लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत असल्याचंही जम्मू काश्मीर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

  1. Terrorist Encounter In JK : जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलाची संयुक्त कारवाई; एका वर्षात 31 दहशतवाद्यांचा केला खात्मा
  2. Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं

Last Updated : Oct 10, 2023, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.