ETV Bharat / bharat

Jio Compulsory For Government Employee : गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना - जिओ

गुजरात सरकारने अचानक आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जिओ वापरणे बंधनकारक केले आहे. या पूर्वी कर्मचारी वोडाफोन आयडियाची सुविधा वापरत होते. मात्र आता सरकारने जिओ वापरण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

Jio Compulsory For Government Employee
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 9, 2023, 7:58 AM IST

अहमदाबाद : गुजरातमधील सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. गुजरात सरकारने वोडाफोन, आयडियाची सेवा बंद केली आहे. त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांचे क्रमांक जिओमध्ये वळवण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना 37.50 रुपयांमध्ये रिलायन्स जिओ मासिक भाडे योजना मिळणार आहे. या प्लॅनद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही मोबाइल ऑपरेटर, लँडलाइनवर मोफत कॉलिंग करता येईल. यासोबतच यूजरला दर महिन्याला 3 हजार SMS मोफत मिळणार आहेत.

सोमवारपासून कर्मचाऱ्यांचे क्रमांक ट्रान्सफर : गुजरात सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जिओ बंधनकारक केल्यामुळे सोमवारपासून या कर्मचाऱ्यांचे आयडिया, वोडाफोनची सेवा बंद करण्यात आली आहे. गुजरात सरकारने याबाबतचा आदेश जारी केला आहे. याअंतर्गत सोमवारपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वोडाफोन-आयडियाची सेवा बंद करण्यात आल्याचेही कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले आहे. यासोबतच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सर्व नंबर रिलायन्स जिओकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

सरकारने केली अधिसूचना जारी : गुजरातमध्ये आतापर्यंत राज्य सरकारी कर्मचारी अधिकृतपणे वोडाफोन-आयडिया कंपनीचे पोस्टपेड मोबाईल नंबर वापरत होते. पण सोमवारी 8 मे रोजी गुजरात सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये तात्काळ प्रभावाने वोडाफोन आयडियाच्या जागी रिलायन्स जिओ नंबर वापरण्यास सांगितले आहे. रिलायन्स जिओच्या प्लॅननुसार कर्मचारी फक्त 37.50 रुपयांच्या मासिक भाड्याने जिओचा CUG प्लान वापरू शकणार आहेत.

असा असेल कर्मचाऱ्यांसाठी प्लॅन : सरकारी कर्मचाऱ्याला रिलायन्स जिओ मासिक भाडे योजना 37.50 मध्ये मिळणार आहे. या प्लॅनद्वारे कोणत्याही मोबाइल ऑपरेटर, लँडलाइनवर मोफत कॉलिंग करता येईल. यासोबतच यूजरला दर महिन्याला 3 हजार SMS मोफत मिळणार आहेत. हे एसएमएस वापरल्यानंतर प्रत्येक एसएमएससाठी 50 पैसे शुल्क आकारले जाईल. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय एसएमएससाठी प्रति संदेश 1.25 रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. रिलायन्स जिओसोबत झालेल्या करारानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनाही या प्लॅन अंतर्गत दरमहा 30 जीबी 4जी डेटा दिला जाईल. ही मर्यादा संपल्यानंतर डेटा वाढवण्यासाठी प्लॅनमध्ये 25 रुपये खर्च करावे लागतील. या अतिरिक्त शुल्काद्वारे 60 GB पर्यंत 4G डेटा उपलब्ध होईल. 4G अमर्यादित प्लॅन जोडण्यासाठी दरमहा 125 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी सरकारी कर्मचाऱ्याला 4G च्या किमतीत 5G प्लॅन मिळणार आहे.

सरकारने अचानक घेतला निर्णय : आतापर्यंत गुजरात सरकार आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फक्त वोडाफोन, आयडियाची पोस्टपेड सेवा वापरत होते. यात बदल करून रिलायन्स जिओच्या सेवा सुरू करण्याचा हा निर्णय अचानक समोर आला आहे. सरकारी अधिसूचनेत जे कर्मचारी आधीच वोडाफोन आयडिया नंबर वापरत होते, ते सरकारी नंबर मोबाईल पोर्टेबिलिटीद्वारे जिओला हस्तांतरित करून वापरण्यात येतील. त्यामुळे क्रमांकात कोणताही बदल होणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा -

Election Commission Notice To Sonia Gandhi : कर्नाटकच्या सार्वभौमत्वावरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाने मागितले स्पष्टीकरण

Karnataka Election 2023 : 'कर्नाटकात मुस्लिम आरक्षण वाढवण्यासाठी काँग्रेस कुणाच्या आरक्षणाला कात्री लावणार?'

तेलंगणात लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत, आम्ही युवकांच्या मागण्या अंमलात आणू -प्रियांका गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.