ETV Bharat / bharat

Education Minister Exam : अबब...! शिक्षणमंत्रीच बारावी पास नाही, यंदा देणार होते परीक्षा, पण ...

झारखंड राज्याचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो (Jharkhand Education Minister Jagarnath Mahto) हे चक्क बारावी पास (Intermediate Exam) नसून, ते यावर्षी परीक्षा देणार होते. मात्र, तब्येत ठीक नसल्याने तयारी झाली नाही यामुळे परीक्षा देणार नसल्याचे महतो यांनी स्पष्ट केले आहे. महतो यांनी ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या डुमरीमधील देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता.

Jagarnath Mahto
झारखंड राज्याचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो
author img

By

Published : Mar 24, 2022, 7:17 PM IST

रांची(झारखंड) - सध्या विविध राज्यांमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षांचे सर्व नियोजन शिक्षणमंत्र्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शिक्षण विभागाकडे असते. मात्र, राज्याचा शिक्षणमंत्रीच जर बारावीची परीक्षा देणार असेल तर हे सगळ्यांसाठी नवलच म्हणावे लागेल. पण हे खरे आहे, झारखंड राज्याचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो (Jharkhand Education Minister Jagarnath Mahto) हे चक्क बारावी पास (Intermediate Exam) नसून, ते यावर्षी परीक्षा देणार होते. मात्र, तब्येत ठीक नसल्याने तयारी झाली नाही यामुळे परीक्षा देणार नसल्याचे महतो यांनी स्पष्ट केले आहे.

झारखंड राज्याचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो

शिक्षणमंत्रीच बारावीची परीक्षा देणार नाहीत : झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो हे यावेळीही बारावीची परीक्षा देणार नाहीत. त्यांनी त्यांच्याच विधानसभा मतदारसंघातील नवाडीह इंटर कॉलेजमध्ये बारावी आर्ट्सला प्रवेश घेतला होता. मात्र, 1 महिन्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे गेल्या वेळी परीक्षेचा फॉर्म भरूनही त्यांना परीक्षा देता आली नव्हती. यावेळीही ते पूर्णपणे बरे नसल्याने त्यांनी परीक्षेची तयारी केली नाही. यामुळेच यावेळीही त्यांनी बारावीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, परीक्षा देणाऱ्या बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना जगरनाथ महतो यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑगस्ट 2020 मध्ये घेतला होता प्रवेश : शिक्षणमंत्री जगरनाथ महतो म्हणाले की, परीक्षा ही फक्त सहभागी होण्यासाठी नसते. परीक्षेसाठी तयारी करणे गरजेचे असते. मात्र, मला मागील वर्षी कोरोना झाला होता. त्यामुळे त्यावेळेसही परीक्षा देता आली नाही. आताही मी कोरोनातून पूर्णपणे ठीक झालो नाही आणि त्यामुळेच परीक्षेसाठीची तयारी माझी झाली नाही. त्यामुळे मी आताही परीक्षा देणार नाही. मात्र, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्चा देतो. तसेच परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचे सरकार पुरस्कार देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, असे जगरनाथ महतो म्हणाले. जगरनाथ महतो यांनी ऑगस्ट 2020 मध्ये त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात असलेल्या डुमरीमधील देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत लाईनमध्ये उभे राहून आपला अर्ज दाखल केला होता.

दहावी पास शिक्षणमंत्री म्हणून हिणवले : शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांनी सांगितले की, मी १९९५ मध्ये नेहरू हायस्कूल टेलोमधून दहावीची परीक्षा द्वितीय श्रेणीने उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर मी शिक्षण सोडले. त्यानंतर दहावी उत्तीर्ण शिक्षणमंत्री असे म्हणत विरोधकांनी मला डिवचायला सुरुवात केली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देण्याच्या उद्देशाने मी अकरावीला प्रवेश घेतला. मी स्वतः अभ्यास करणार असून, मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.