ETV Bharat / bharat

Congress criticises BJP ख्रिश्चन धर्मगुरुंसोबतच्या चर्चेबाबत भाजप समाजात द्वेष पसरवित आहे, काँग्रेसचा आरोप

150 दिवसांच्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यात वादग्रस्त कॅथलिक धर्मगुरू जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीतील चर्चेची चुकीची माहिती भाजप पसरवित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. Congress criticises BJP

Congress criticises BJP
Congress criticises BJP
author img

By

Published : Sep 10, 2022, 3:13 PM IST

Updated : Sep 10, 2022, 4:31 PM IST

कन्याकुमारी (तामिळनाडू) : काँग्रेसने शनिवारी भाजपवर दुष्प्रचार केल्याचा आरोप केला आणि 'भारत जोडो यात्रा' यशस्वीपणे सुरू केल्यापासून सत्ताधारी पक्ष अधिक हताश झाल्याचा दावा केला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी ( Congress leader Rahul Gandhi ) एका ख्रिश्चन धर्मगुरूसोबत येशू देव असल्याच्या संभाषणाबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या ट्विटवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, भाजपची "द्वेषाची फॅक्टरी" गांधींबद्दलचे ट्विट शेअर करत आहे, ज्याचा ऑडिओशी काहीही संबंध नाही. भाजपच्या द्वेष निर्मिती करणाऱ्या कारखान्यातून एक अत्याचारी ट्विट फिरत आहे. ऑडिओमध्ये जे रेकॉर्ड केले आहे त्याच्याशी आमचा त्याचा काहीही संबंध नाही. हा भाजपचा एक प्रकारचा खोडसाळपणा आहे, जो भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर भाजप हताश झाल्याचे द्योतक आहे. भारत जोडो यात्रेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे रमेश यांनी ट्विट केले.

महात्मा गांधींच्या हत्येला आणि नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांसारख्या लोकांच्या हत्येला जबाबदार असणारे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. किती विचित्र विनोद आहे. भारत जोडो यात्रेच्या भावनेला हानी पोहोचवण्याचे असे प्रयत्न सपशेल अपयशी ठरतील, असे रमेश यांनी म्हटले आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एका ख्रिश्चन धर्मगुरूंसोबतचा राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, राहुल गांधींना भेटलेले जॉर्ज पोनय्या म्हणतात, 'शक्ती (आणि इतर देवांच्या) शिवाय केवळ येशू हा एकमेव देव आहे'. या व्यक्तीला त्याच्या हिंदू द्वेषासाठी यापूर्वी अटक करण्यात आली होती, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. पोनय्या याने असेही म्हटले होते की, 'मी शूज घालतो कारण भारत मातेची अशुद्धता आपल्याला दूषित करू नये', असेही पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • It's Rahul Gandhi's Nafrat Jodo Abhiyan. Today they've made a person like George Ponnaiah the poster boy of Bharat Jodo Yatra who challenged, threatened Hindus & said inappropriate things about Bharat Mata. Congress has a long history of being anti-Hindu: Shehzad Poonawalla, BJP pic.twitter.com/HMtdnY8MiR

    — ANI (@ANI) September 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनीही काँग्रेसवर या मुद्यावरून हल्ला चढविला आहे. काँग्रेस नेत्यांनी तर याआधी प्रभू श्रीरामांचे पुरावे दाखवा असेही म्हटले होते, असा आरोप संबीत पात्रा यांनी ट्विटद्वारे केली आहे.

  • Not the 1st time. There are numerous occasions when Congress, Sonia Gandhi&Rahul Gandhi have made indecent remarks against Hindu religion - be it demanding proof of Lord Ram or this issue of Maa Shakti: BJP's Sambit Patra on video of Rahul Gandhi with Tamil pastor George Ponnaiah pic.twitter.com/W96EjDg8co

गेल्या काही वर्षांत सलग निवडणुकीतील पराभवाचा सामना करणार्‍या काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी काँग्रेस नेते गांधी यांनी देशभरातील लोकांशी जोडण्यासाठी 3,570 किमीची 'भारत जोडो यात्रा' काढली आहे.

Last Updated : Sep 10, 2022, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.