कोटा : देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी संयुक्त प्रवेश परीक्षा असलेल्या जीईईचा (JEE MAIN 2023) निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट https://jeemain.nta.nic.in/ वर जाऊन विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. यासाठी त्यांना सुरक्षा कोडसह त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागणार. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने वेबसाइटवर स्टुडंट अॅक्टिव्हिटीवर यासाठी तीन लिंक जारी केल्या आहेत. स्कोअर कार्डमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची अखिल भारतीय रँक आणि श्रेणी रँक देखील जारी करण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचा कटऑफही देण्यात आला आहे.
कट ऑफ पर्सेंटाइलमध्ये बरेच बदल : यावर्षी सर्व श्रेणींमध्ये कट ऑफ पर्सेंटाइलमध्ये बरेच बदल झाले आहेत. सर्व श्रेणींमध्ये JE Advanced cutoff टक्केवारी वाढली आहे. ही टक्केवारी 2.4 ते 12.5 गुणांपर्यंत असल्याची माहिती कोटाचे शिक्षणतज्ज्ञ देव शर्मा यांनी दिली. जे विद्यार्थी पूर्वीपेक्षा जास्त चांगले गुण मिळवतात, त्यांना प्रगतीसाठी पात्र मानले जाते. त्यापैकी सर्वसाधारण श्रेणीच्या कट ऑफ पर्सेंटाइलमध्ये सुमारे २.४ चा फरक आहे. त्याचप्रमाणे EWS मध्ये 12.5 टक्के, OBC NCL मध्ये 6.6 आणि SC श्रेणीमध्ये सुमारे 9 टक्के वाढ झाली आहे. तसेच एसटी प्रवर्गातील हा फरक ११.५ टक्के इतका झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
काय आहे यावर्षी कटऑफ पर्सेंटाइल : जेईई मेन 2023 च्या परीक्षेत दोन प्रयत्न झाल्याची माहिती शिक्षण तज्ज्ञ देव शर्मा यांनी सांगितले आहे. यासह जेईई अॅडव्हान्स कटऑफ सामान्य श्रेणीमध्ये 90.7788642, ईडब्ल्यूएसमध्ये 75.6229025, ओबीसी एनसीएलमध्ये 73.6114227, एससी 51.9776027, एसटी 37.2348772 आणि पीडब्ल्यूडी 0.350 आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये सामान्य श्रेणी कटऑफ 88.4121383, ईडब्ल्यूएस 63.1114141, ओबीसी 67.0090297, एससी 43.0820954, एसटी 26.7771328 आणि पीडब्ल्यूडी 0.0031029 इतका होता.
जॉइंट एंट्रन्स एक्झाम अर्ज 30 एप्रिलपासून भरता येणार : आता 30 एप्रिलपासून जॉइंट एंट्रन्स एक्झाम अॅडव्हान्ससाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. जेईई मेन 2023 मधून उत्तीर्ण झालेले 2.5 लाख विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. ही परीक्षा 4 जून रोजी होणार आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेत असल्याची माहितीही देव शर्मा यांनी यावेळी दिली आहे.
4 जूनला होणार संयुक्त प्रवेश परीक्षा : जेईई मेन परीक्षेच्या एप्रिल सत्रात तब्बल 9 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमावले आहे. ही परीक्षा 6 ते 15 एप्रिल दरम्यान संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्यात आली. या निकालात तब्बल 2.5लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये 1 लाख 01 हजार 250 सामान्य श्रेणी, ईडब्ल्यूएस 25 हजार, ओबीसी 67 हजार 500, एससी 37 हजार 500 आणि एसटी 18 हजार 750 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता 30 एप्रिलपासून संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. जेईई मेन 2023 मधून उत्तीर्ण झालेले 2.5 लाख विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. ही परीक्षा 4 जून रोजी होणार आहे. यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी जेईई अॅडव्हान्स परीक्षा घेत आहे.
हेही वाचा - Wrestler Protest In Delhi : कुस्तीपटूंना न्याय मिळेल का, दिग्गज खेळाडूंचा सवाल, प्रियंका गांधीही आंदोलकांना भेटल्या