ETV Bharat / bharat

रस्त्यासाठी तारांच्या साह्याने जेसीबीला केले नदी पार - जेसीबी न्यूज

विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या बांधकामासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला पहिल्या टप्प्यातील मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये लवकरच रस्त्याची सुविधा मिळण्याची आशा जागृत झाली आहे.

हवेत जेसीबी
हवेत जेसीबी
author img

By

Published : May 4, 2021, 7:53 PM IST

चामोली - बर्‍याच दिवसांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या द्विंग-तपोण परिसरातील ग्रामस्थांची मागणी पूर्ण होणार आहे. येथे पूल नसल्यामुळे रस्त्याचे काम अडकले होते. सर्वात मोठे आव्हान जेसीबी मशीन नदीच्या दुसर्‍या काठावर नेणे होते. परंतु कंत्राटदाराने जेसीबी मशीनला तारांद्वारे अलकनंदा नदी ओलांडून नेले. हे पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. जेसीबी पोहोचल्यानंतर आता ग्रामस्थांना रस्त्याची सुविधा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

हेही वाचा - तामिळनाडू : 'द्रमुक'च्या विजयानंतर महिलेने कापली जीभ; देवीला केला होता नवस

सहा किलोमीटर रस्त्यास २०१०मध्ये मंजुरी

लांजी, पोखणी, ह्युना, द्विंग व तपोण गावातील जवळपास 25 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामस्थांना रस्त्याने जोडण्यासाठी द्विंग-तपोण या सहा किलोमीटर रस्त्यास २०१०मध्ये मंजुरी देण्यात आली होती. सन २०१८मध्ये यासाठी वनजमीन हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण झाली. पण येथीला सर्वात मोठा अडथळा म्हणजे अलकनंदा नदी. तर, अलकनंदाच्या दुसर्‍या टोकाला जाऊन रस्ता तयार करायचा होता.

हवेत जेसीबी

सात किमी जात होते पायी

अशा परिस्थितीत दोनशे मीटर टेकडी फोडल्यानंतर येथे पूल प्रस्तावित करण्यात आला होता, परंतु पूल मान्य न झाल्याने दुसरीकडे मानवी श्रम करून काम करण्यासही वेग येत नव्हता. यामुळे वर्षानुवर्षे रस्ता मान्य झाल्यानंतरही इथले गावकरी आपल्या गंतव्य स्थानावर जाण्यासाठी सुमारे सात किलोमीटर अंतर कापून पायी जात होते.

हेही वाचा - ओडिशा : कोरोना रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी मंत्र्याने स्वतः चालवली अ‌ॅम्बुलन्स

रस्ता सुविधा मिळण्याची आशा

अशा परिस्थितीत आता जेसीबीला कंत्राटदार मोहनसिंग बिष्ट यांनी येथील अलकनंदा नदीच्या दोन्ही टोकाला वायर बांधून साखळीद्वारे नदीच्या दुसर्‍या टोकाकडे नेले. यामुळे आता येथील रस्ता बांधकामाला वेग येईल. विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या बांधकामासाठी पाठविलेल्या प्रस्तावाला पहिल्या टप्प्यातील मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये लवकरच रस्त्याची सुविधा मिळण्याची आशा जागृत झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.