नवी दिल्ली Jawaharlal Nehru Birth Anniversary : माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज शांतीवन या त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी "देशाला प्रथम स्थानावर नेण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी नेहमीच प्राधान्य दिलं" अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहिली.
माजी पंतप्रधान पंडित नेहरूंना वाहिली आदरांजली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदिय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आदींसह वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीदिनी शांतीवन इथं आदरांजली अर्पण केली.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या सन्मानार्थ 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा करण्यात येतो. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना प्रेमानं चाचा नेहरू असं म्हटलं जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रयागराजमध्ये झाला पंडितजींचा जन्म : पंडित नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं झाला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भूमिका बजावल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे 15 ऑगस्ट 1947 ला पहिले पंतप्रधान झाले. पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आदी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जाते. 1954 मध्ये संयुक्त राष्ट्रांनं 20 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन म्हणून घोषित केला. त्यामुळे 1956 पूर्वी भारतानं बालदिन साजरा केला. मात्र आपल्या जीवनात विविध यश संपादन केल्यानंतर 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित नेहरूंच्या निधनानंतर संसदेत एकमतानं ठराव मंजूर करुन त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय बालदिन म्हणून घोषित करण्यात आला.
हेही वाचा :