ETV Bharat / bharat

Jasprit Bumrah Rulled Out T20 World Cup : टीम इंडियाच्या अपेक्षांना लागला सुरुंग; बुमराह टी-20 विश्वचषकातून झाला बाहेर - जसप्रीत बुमराहा टी20 विश्वचषकातून बाहेर

भारतीय संघाला दोन आठवड्यांनी टी-20 विश्वचषक ( T20 World Cup ) खेळायचा आहे. यामध्ये संघाला 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. विश्वचषकापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेला जसप्रीत बुमराह यावेळी विश्वचषक खेळू शकणार ( Jasprit Bumrah ruled out T20 World Cup ) नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराह
author img

By

Published : Oct 4, 2022, 10:24 AM IST

हैदराबाद: दोन आठवड्यांनंतर होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी ( ICC T20 World Cup 2022 ) भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर झाला ( Jasprit Bumrah Rulled Out T20 World Cup 2022 ) आहे. बुमराह सतत पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. नुकतीच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळली. बुमराहने या मालिकेत दोन सामने खेळले. यानंतर तो दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला.

बीसीसीआयच्या अपेक्षांना बसला धक्का -

तेव्हापासून, बुमराह विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता होती, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांच्याशिवाय प्रशिक्षक राहुल द्रविड ( Coach Rahul Dravid ) यांनीही बुमराह शेवटच्या क्षणापर्यंत बरा होईल अशी आशा व्यक्त केली होती. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक बुमराहची चौकशी करत होते. पण आता बीसीसीआयने एक निवेदन जारी करून बुमराह वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयने आपल्या निवेदनात काय म्हटले?

बीसीसीआयने निवेदन जारी करताना म्हटले आहे की, 'बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला 2022 च्या टी-20 विश्वचषकातून वगळले ( Jasprit Bumrah ruled out T20 World Cup ) आहे. सर्व प्रकारची तपासणी आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय बोर्डाने सांगितले की, 'जसप्रीत बुमराह पाठीच्या ( Jasprit Bumrah back injury ) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेतून आधीच बाहेर गेला आहे. आता बीसीसीआय लवकरच विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी संघात दुसऱ्या गोलंदाजाच्या नावाची घोषणा करणार आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यांनंतर टीम इंडिया घेणार भरारी -

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळत आहे. पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना इंदूरमध्ये 4 ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर भारतीय संघ 5 ऑक्टोबरला विश्वचषकासाठी उड्डाण करेल.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

हेही वाचा - Ind Vs Sa 3rd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज तिसरा सामना, मालिका जिंकूनही भारतीय गोलंदाजांवर असेल नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.