ETV Bharat / bharat

14th India Japan Summit : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसीय भारत दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींची घेतली भेट - फुमियो किशिदा भारत दौरा

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ( Japanese PM Fumio Kishida India Visit ) दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ते 14व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेलाही ( 14th India-Japan summit ) हजेरी लावतील. तसेच आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Fumio Kishida to meet PM Modi today ) यांची भेट घेतली.

14th India Japan Summit
14th India Japan Summit
author img

By

Published : Mar 19, 2022, 5:02 PM IST

Updated : Mar 19, 2022, 10:18 PM IST

नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा ( Japanese PM Fumio Kishida India Visit ) दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, ते 14व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेलाही ( 14th India-Japan summit ) हजेरी लावतील. आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishnaw ) यांनी त्याचे विमानतळावर स्वागत केले. किशिदा यांचा हा पहिलाच देशाचा दौरा आहे. तसेच आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Fumio Kishida to meet PM Modi today ) यांची भेट घेतली.

'मी भारत आणि नंतर कंबोडियाच्या दौऱ्यावर जात आहे, युक्रेनवरील रशियन आक्रमण पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व वाढले आहे. जपान आणि भारत यासाठी एकत्र काम करतील', अशी प्रतिक्रिया फुमियो किशिदा यांनी दिली आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एका निवेदनात जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी दोन्ही देश आपली भागीदारी आणखी मजबूत करण्याचा विचार करत असल्याचे म्हटले. तसेच शिखर परिषद दोन्ही देशांना विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचे पुनरावलोकन आणि मजबूत करण्यासाठी तसेच परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी प्रोत्साहित करते, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, भारत-जपान शिखर परिषदेनंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. COVID नंतरच्या शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध जगासाठी दोन्ही देश कटीबद्ध असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

  • Ministry of External Affairs releases a joint statement on the India-Japan Summit partnership for a "peaceful, stable and prosperous post-COVID world." (1/2) pic.twitter.com/vFrIu43ZzJ

    — ANI (@ANI) March 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Jayant Patil Answered To Imtiaz Jaleel : आधी एमआयएमने हे सिद्ध करावे की, ते भाजपाची बी टीम नाही - जयंत पाटली

Last Updated : Mar 19, 2022, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.