श्रीनगर Jammu Kashmir Encounter : जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचं, अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम भागात चकमक सुरू आहे. पोलीस, भारतीय सैन्य दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) अधिकारी घटनास्थळी असल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिली आहे.
शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम भागात चकमक : काश्मीर झोन पोलिसांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर एका पोस्टमध्ये सांगितलं की, शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम भागात चकमक सुरु झालीय. शोपियान पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफ ड्युटीवर आहेत. या चकमकीची पुढील माहिती लवकरच दिली जाईल. याआधी गुरुवारी OGW मॉड्यूलचा बिरवाह, बडगाम येथे भंडाफोड करण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी X वर एका संक्षिप्त पोस्टमध्ये या घटनेची माहिती देताना सांगितलं होतं की, "बडगाम पोलिसांनी बीरवाह भागात सात लोकांचं मॉड्यूल नष्ट केलंय. हे लोक बीरवाह परिसरात आणि आसपास पोस्टर चिकटवून देशविरोधी दहशतवादी प्रचारात गुंतले होते."
ड्रग्ज तस्करी प्रकरणात एकाला अटक : गुरुवारीच काश्मीर पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणात एका संशयिताला अटक केली. कुलगाम पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर मोहम्मद इशाक शाह, बांगल येथील रहिवासी याला अटक केली. त्याच्याकडून 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु असल्याचं पोलिसांनी X वर एका पोस्टद्वारे सांगितलं होतं.
मागील आठवड्यात पाच जवान हुतात्मा : जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्यानं पाच जवान हुतात्मा तर दोन जण जखमी झाले होते. अधिकार्यांनी सांगितलं की, "सुरनकोट पोलीस ठाण्यांतर्गत ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या वळणावर शोध मोहिमेच्या ठिकाणी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. यानंतर याठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती."
हेही वाचा :