जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती त्राल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या जैशच्या योजनेनुसार आला होता. त्याचा तो प्लान होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
-
Two local terrorists were involved in the killing of two railway protection jawans. One terrorist has been arrested and the other will be arrested or neutralised soon: Vijay Kumar, IGP Kashmir https://t.co/SOGEeFotlW pic.twitter.com/IKN47YzwGi
— ANI (@ANI) April 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two local terrorists were involved in the killing of two railway protection jawans. One terrorist has been arrested and the other will be arrested or neutralised soon: Vijay Kumar, IGP Kashmir https://t.co/SOGEeFotlW pic.twitter.com/IKN47YzwGi
— ANI (@ANI) April 23, 2022Two local terrorists were involved in the killing of two railway protection jawans. One terrorist has been arrested and the other will be arrested or neutralised soon: Vijay Kumar, IGP Kashmir https://t.co/SOGEeFotlW pic.twitter.com/IKN47YzwGi
— ANI (@ANI) April 23, 2022
बिलाल अहमद या आणखी एका व्यक्तीची ओळख पटली - "त्राल येथील रहिवासी असलेल्या शफीक अहमद शेखला अटक करण्यात आली आहे. त्याला जैशने (दहशतवादी संघटनेने) जम्मूमध्ये येण्याची सूचना दिली होती. त्याला दोन दहशतवाद्यांना त्याच्या घरी ठेवायचे होते. ते त्याच्या घराजवळील सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करणार होते. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी माध्यमांना सांगितले. "बिलाल अहमद या आणखी एका व्यक्तीची ओळख पटली आहे, जो सांबा परिसरातून दहशतवाद्यांना उचलून शफीक अहमद शेख यांच्याकडे आणणार होता. सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करण्यापूर्वी ते एका चकमकीत मारला गेला होता.
मोठ्या कटाचा भाग - दरम्यान, शनिवारी कुलगाममधील मिरहामा भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. आज रविवारी (दि. 24 एप्रिल)रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला या घडामोडी घडल्या आहेत. याआधी शुक्रवारी, या प्रदेशात दोन पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले होते. ज्यांना पोलिसांनी केंद्रशासित प्रदेशात पंतप्रधानांच्या भेटीची तोडफोड करण्याच्या "मोठ्या कटाचा" भाग असल्याचा संशय व्यक्त केला होता.
हेही वाचा - Ursula Von Der Leyen : युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांचे भारतात आगमन