अनंतनाग बुधवारी पहाटे अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड भागात जवाहर बोगद्याजवळ ढगफुटीमुळे Cloud Burst Hits Near Jawahar Tunnel तात्पुरता तंबू आणि गुरे वाहून गेली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस, प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांनी बचावकार्य सुरू केले आहे. निसर्गाच्या या आपत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ढगफुटीमुळे Jammu Kashmir Cloudburst मुसळधार पाऊस झाल्याने परिसर जलमय झाला होता. यानंतर परिसरात भितीदायक दृश्य समोर आले. आज काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील नीरा भागात ढगफुटीमुळे परिसरात मोठे नुकसान झाले होते. मुसळधार पावसामुळे ढगफुटीमुळे महार येथे दोन महिला वाहून गेल्याची माहिती आहे. पूरस्थितीमुळे अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.
अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. बेपत्ता झालेल्या महिलांची नावे शब्बीर अहमद यांची पत्नी सकीना बेगम आणि मुलगी रोजा बानो अशी आहेत. शब्बीरने सांगितले की, त्याने तीन मुलांना वाचवले पण त्याची पत्नी आणि एक मुलगी जोरदार प्रवाहात वाहून गेली.
हेही वाचा - देशभक्ती शिकवायची गरज नाही, देशभक्ती काँग्रेसच्या रक्तात, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला