ETV Bharat / bharat

Awantipora Encounter : अवंतीपोरामध्ये लष्कराची मोहीम फत्ते! एका दहशतवाद्याचा खात्मा

अवंतीपोरा (Terrorist killed in Awantipora) येथील बरागाम भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी मोहिम राबवण्यात आली होती

अवंतीपोरा
Awantipora Encounter
author img

By

Published : Dec 12, 2021, 10:05 AM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा (Terrorist killed in Awantipora) येथील बरागाम भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. गुप्त माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार केला. यावर सुरक्षादलाकडून योग्य प्रत्युत्तर देण्यात आले. यात एक दहशतवादी ठार झाला.

बुधवारी शोपियान जिल्ह्यातील चेक चोलन भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. दहशतवादी नेहमीच छुप्या मार्गाने काश्‍मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारतीय लष्काराचे जवान दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावतात.

लष्कराकडून डोळ्यात तेल घालून निगराणी -

पाकमधून कायम रात्रीच्या वेळी दुर्गम भागातून भारतीय सीमेत घुसखोरी होते. दहशतवादी जमिनीखाली भुयार खोदून भारतीय सीमेत घुसखोरी करतात. पाकव्याप्त काश्मीर भागात सुमारे 200 ते 250 दहशतवादी तळ कार्यरत असून येथील दहशतवादी भारतात प्रवेश करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती. मात्र, सीमेवरील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी लष्कराकडून डोळ्यात तेल घालून निगराणी करण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.