ETV Bharat / bharat

18 ते 44 वयोगटातील लसीकरणात गुजरातला झुकते माप; जयराम रमेश यांचा आरोप

माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम महेश यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेबाबत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ 11 राज्यांनाच 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण करणे का शक्य झाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Jairam Ramesh
जयराम रमेश
author img

By

Published : May 3, 2021, 7:52 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम महेश यांनी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणात भेदभाव होत असल्याचा मोदी सरकारवर आरोप केला आहे. 2 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणापैकी एकट्या गुजरातमध्ये 60 टक्के लसीकरण झाल्याचा दावा त्यांनी केला.

माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम महेश यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेबाबत तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.

Jairam Ramesh Tweet
जयराम रमेश यांचे ट्विट
  1. 2 मे रोजी लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटासाठी केवळ 86,023 लाभार्थीच का असा प्रश्न जयराम यांनी विचारला आहे.
  2. केवळ 11 राज्यांनाच 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण करणे का शक्य झाले?
  3. 2 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणापैकी एकट्या गुजरातमध्ये 60 टक्के लसीकरण झाले. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

हेही वाचा-एका रात्रीत लशींचे उत्पादन वाढविणे शक्य नाही- आदर पुनावाला

पराष्ट्रमंत्र्यांबरोबर जयराम रमेश यांचे ट्विटरवर वाक्युद्ध

दिल्लीमधील इंडियन युथ काँग्रेसने फिलिपाईन्सच्या राजदुत कार्यालयाला ऑक्सिजन सिलिंडरची मदत केली होती. त्यावरून परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम शंकर यांनी स्वस्तातील प्रसिद्धी अशी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावरून सुब्रमण्यम शंकर आणि जयराम रमेश यांच्यामध्ये नुकतेच ट्विटरवरून वाक्युद्ध झाले होते. गरजुंना मदत करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही कृपया काम करा, असा टोलावजा सल्ला जयराम यांनी पराष्ट्रमंत्र्यांना दिला होता.

हेही वाचा-पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रिपदाची घेणार शपथ

गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक-

गुजरातमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 12,978 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 153 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये एकूण 1,46.818 कोरोनाबाधित सक्रिय आहेत. राज्यात 2 मे रोजीच्या आकडेवारीनुसार नवीन 56 हजार 647 कोरोबाधित वाढले आहेत. तर 669 जणांचा महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-ह्रदयद्रावक! बंगळुरूमध्ये स्मशानभूमीच्या बाहेर लागले 'हाऊस फुल'चे फलक

गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात लसीकरण 18 ते 44 वयोगटात कमी-

केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या ट्विटप्रमाणे 2 मे रोजी 18 ते 44 वयोगटात 51,622 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात 2 मे रोजी 18 ते 44 वयोगटात 12,525 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. लशींचा पुरवठा होत नसल्याने महाराष्ट्र सरकारने या वयोगटासाठी लसीकरण करणे शक्य नसल्याचे सुरुवातीला जाहीर केले होते. मात्र, महाराष्ट्र दिनाला उपलब्धतेप्रमाणे मोजक्याच नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 कोटी जणांच्या लसीकरणासाठी एक रकमी चेक देण्याची तयारी दर्शविली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.