ETV Bharat / bharat

Child Kidnapped Mumbai : १२ वर्षीय मुलाचे मुंबईतून अपहरण.. राजस्थानात ठेवले होते कोंडून, पोलिसांकडून सुटका - अपहरण झालेल्या मुलाची जयपूर पोलिसांनी केली मुक्तता

जयपूरच्या शिप्र पथ पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबईतून अपहरण करण्यात आलेल्या १२ वर्षाच्या मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली ( Police freed kidnapped child in Jaipur ) आहे. तसेच अपहरणकर्त्यालाही अटक करण्यात आली ( Jaipur Police Big Action ) आहे. पोलिसांनी मुलाला चाइल्ड हेल्पलाइनच्या ताब्यात दिले आहे.

१२ वर्षीय मुलाचे मुंबईतून अपहरण.. राजस्थानात ठेवले होते कोंडून, पोलिसांकडून सुटका

author img

By

Published : Feb 19, 2022, 7:45 PM IST

जयपूर ( राजस्थान ) : जयपूरच्या शिप्र पथ पोलिसांनी मोठी कारवाई ( Jaipur Police Big Action ) करत मुंबईतून अपहरण केलेल्या १२ वर्षीय मुलाची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली ( Police freed kidnapped child in Jaipur ) आहे. तसेच अपहरणकर्त्यालाही अटक केली आहे.

अशी झाली मुलाची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक व्यक्तीने दुपारी 1 वाजता शिप्रा पथ पोलीस स्टेशनचे अधिकारी महावीर सिंह राठोड यांना फोन केला. मानसरोवर सेक्टर 7 मधील एका निर्माणाधीन घरातून एका मुलाच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. यावर पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून १२ वर्षीय मुलाची सुटका केली. तसेच एका मध्यमवयीन व्यक्तीलाही अटक केली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर आरोपीने मुलाला चादर पांघरून टाकून पकडले होते. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आरोपीला पकडले.

दीड महिन्यापासून आरोपी करत होता अत्याचार

पोलिस मुलाशी बोलले असता त्याने सांगितले की, आरोपी कैलाश चंद याने 7 जानेवारी रोजी मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोलीस स्टेशन परिसरातून त्याचे अपहरण केले. त्याला जयपूरला आणले. त्यानंतर आरोपीने बांधकाम सुरू असलेल्या घरात मुलाला ओलीस ठेवले. गेल्या दीड महिन्यापासून अत्याचार सुरू होते. पोलिसांनी आरोपी कैलाश चंद याला अटक करून शनिवारी दुपारी विशेष न्यायाधीश पॉक्सो कायदा जयपूर महानगर न्यायालयात हजर केले. तेथून त्याला तुरुंगात पाठवण्याचे आदेश देण्यात आले.

आरोपीवर यापूर्वीही दोन गुन्हे

पोलिसांनी सुटका केलेल्या मुलाला चाइल्ड हेल्पलाइनकडे सुपूर्द केले. त्याला निवारागृहात ठेवण्यात आले आहे. मुलाच्या अपहरणप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जयपूर पोलिसांनी मुंबई पोलिसांना याबाबत कळवले आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांचे पथक मुलाला घेऊन रवाना झाले आहे. आरोपी कैलाश चंदच्या गुन्ह्यांची नोंद यापूर्वीही सापडली असून, त्याच्यावर भीलवाडा येथे दोन गुन्हे दाखल आहेत. स्थानिक व्यक्तीच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी वेळीच आरोपीच्या तावडीतून मुलाची सुटका करून घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.