ETV Bharat / bharat

Jaipur Foot USA : एकाच पायाने शाळेत जातो जम्मूत दिव्यांग विद्यार्थी, जयपूर फूट एनजीओ करणार मदत

author img

By

Published : Jun 4, 2022, 9:32 PM IST

जयपूर फूट ही एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) ( Jaipur Foot NGO  ) आहे. ही संस्था विशेष दिव्यांगांचे शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करते. दिव्यांगांना समाजात मान-सन्मान मिळावा आणि स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी ही संस्था कृत्रिम अवयवांच्या माध्यमातून मदत करते.

जयपूर फूट एनजीओ करणार मदत
जयपूर फूट एनजीओ करणार मदत

काश्मीर- नुकतेच काश्मीर खोऱ्यातील हंदवाडा येथे राहणाऱ्या परवेझ अहमद या विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ ( heart rending video of a Parvaiz ) व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये परवेज एका पायाच्या साहाय्याने शाळेत जाताना दिसत आहे. त्याच्या घरापासून शाळेचे अंतर दोन किलोमीटर आहे. परवेझ हे अंतर रोज एका पायाने चालत मेहनतीने पार करतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृत्रिम अवयव बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयपूर फूट यूएसएचे अध्यक्ष प्रेम भंडारी ( Jaipur Foot USA Chairman Prem Bhandari ) यांनी परवेझला कृत्रिम अवयव ( free artificial limb Parvaiz ) देण्याचे आश्वासन दिले.

एनजीओ करणार मदत-जयपूर फूट ही एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) ( Jaipur Foot NGO ) आहे. ही संस्था विशेष दिव्यांगांचे शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मदत करते. दिव्यांगांना समाजात मान-सन्मान मिळावा आणि स्वाभिमानाने जीवन जगता यावे यासाठी ही संस्था कृत्रिम अवयवांच्या माध्यमातून मदत करते. ही संस्था केवळ भारतातच नाही तर विदेशातही तिच्या केंद्रांद्वारे दिव्यांग लोकांना कृत्रिम हातपाय, कॅलिपर आणि इतर भौतिक साधने आणि उपकरणे पुरवते.

डोंगरामधून व्हीलचेअर चालविणे धोक्याचे-जयपूर फूट यूएसएचे अध्यक्ष प्रेम भंडारी यांच्यापर्यंतही परवेझची गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचली. परवेझ हा नववीत शिकणारा विद्यार्थी आहे. अनेक वर्षांपूर्वी अपघातात त्यांचा एक पाय भाजला होता. यानंतर त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्यानंतरही डॉक्टरांना पाय कापावा लागला. पाय कापल्यानंतर शाळेचे अंतर परवेझसाठी डोंगरापेक्षा मोठे झाले. उंच-सखल रस्त्यांवर दोन किलोमीटर एका पायावर चालणे हे त्याच्यासाठी अशक्य होते. अभ्यासाच्या इच्छेने परवेझ खचून न जाता शाळेत जाण्याचा संकल्प पूर्ण करत राहिला. परवेझकडे व्हीलचेअर आहे. पण त्याला डोंगराच्या रस्त्यावर घेऊन जाणे जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे परवेझ स्वतःच्या एका पायावर शाळेत गेला.

परवेझ अहमद हा वाचनात खूप हुशार- परवेझचे वडील गुलाम अहमद म्हणाले की, त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे तो आपल्या मुलाच्या पायावर उपचार करू शकला नाही. त्याला वाचायला आणि खेळायला आवडते. त्यामुळे परवेझ रोज एका पायाने संघर्ष करत शाळेत जातो. त्यांनी प्रशासनाकडे मदत मागितली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, गुलाम हुसेन मीर यांच्या मते, एका पायाने अपंग असलेले परवेझ अहमद नियमितपणे शाळेच्या क्रीडा उपक्रमात सहभागी होतो. व्हॉलीबॉल आणि क्रिकेट खेळतो. परवेझ अहमद हा वाचनात खूप हुशार आहे. परवेझचा अभ्यास आणि त्याची स्वप्ने याविषयीचा उत्साह पाहून आम्ही राज्य सरकारकडे मदतीचे आवाहन केले होते.

हेही वाचा-ओडिशा मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे, मंत्रिमंडळाची होणार पुनर्रचना

हेही वाचा-Kanpur violence: कानपूर हिंसाचार प्रकरणी योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाईचे आदेश, तिघांवर गुन्हे दाखल; 18 जणांना अटक

हेही वाचा-vulgar advertisement : परफ्यूम ब्रँडची आक्षेपार्ह जाहिरात थांबवून कारवाई करा, दिल्ली महिला आयोगाचे अनुराग ठाकूर यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.