ETV Bharat / bharat

DDC Elections : जम्मू काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यात ४८.६२ टक्के मतदान

जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत ४८.६२ टक्के मतदान झाले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2020, 8:36 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत ४८.६२ टक्के मतदान झाले. निवडणुकीचे आणखी सहा टप्पे बाकी आहेत.

जम्मू विभागात ६५.५४ टक्के मतदान पार पडले तर काश्मीर विभागात ३३.३४ टक्के मतदान झाले. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त के. के शर्मा यांनी मतदान पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान झाले आहे. मागील वर्षी काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा माघारी घेण्याचे आश्वासन देवून राज्यातील स्थानिक पक्ष निवडणुका लढत आहेत. तर काश्मीरचा विकास करण्याचे आश्वासन भाजपने दिले मतदारांना दिले आहे.

आठ टप्प्यात होणार मतदान

पहिला टप्पा : 28 नोव्हेंबर दुसरा टप्पा : 01 डिसेंबर तीसरा टप्पा : 04 डिसेंबर

चौथा टप्पा : 07 डिसेंबर पाचवा टप्पा : 10 डिसेंबर सहावा टप्पा : 13 डिसेंबर

सातवा टप्पा : 16 डिसेंबर आठवा टप्पा : 19 डिसेंबर

जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा राज्यातील प्रमुख 6 पक्ष एकत्र निवडणूक लढत आहे. कलम 370 हटवण्यात आल्यानंतर राज्यातील नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, सीपीआय (एम), अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल्स मूव्हमेंट हे पक्ष 'गुपकर अलायन्स' म्हणून एकत्र निवडणूक लढत आहे. यामध्ये भाजपा आणि काँग्रेसचे उमेदवार मैदानात आहेत. सद्य परिस्थितीनुसार राज्यात गुपकर अलायन्स काश्मीरमध्ये मजबूत आहे. तर भाजपाची जम्मूवर पकड आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.