ETV Bharat / bharat

India China Dispute : उणे 40 डिग्री तापमानात ड्रॅगनला नमवण्यासाठी लष्कराची रणनीती, वाचा सविस्तर - आयटीबीपीचे जवान चीन सीमेवर तैनात

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही लष्कर आणि आयटीबीपीचे जवान हिमालयाच्या उंच भागात असलेल्या शेवटच्या चौक्यांवर सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. चीनच्या वाढत्या कारवाया पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क ( Indian Army ready to face China ) झाली आहे.

India China Dispute
भारत-चीन
author img

By

Published : Feb 12, 2022, 3:03 PM IST

नवी दिल्ली - चीनच्या वाढत्या कारवाया पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. चीनच्या ( Indian Army ready to face China ) प्रत्येक हालचालीवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. विशेषत: लिपुलेख खिंडीसह चीनला जोडणाऱ्या सर्व सीमा चौक्यांवर विस्तृत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही लष्कर आणि आयटीबीपीचे जवान हिमालयाच्या उंच भागात असलेल्या शेवटच्या चौक्यांवर सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. हिमवर्षाव हंगामात फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेले सैनिक खालच्या चौक्यांवर स्थलांतरित होत असत. पण, आता बर्फाळ हवामानातही चीनच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सैनिक पूर्णपणे तयार आहेत.

मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार

सैनिक अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज -

चीन आणि नेपाळ सीमेवर असलेल्या सर्व चौक्यांवर लष्करी दल तैनात करण्यासोबतच सैनिकांना आधुनिक सुरक्षा उपकरणेही देण्यात आली आहेत. लष्करी आणि निमलष्करी दलातील जवान युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सतत प्रशिक्षण घेत आहेत. तसेच बर्फाच्छादित हवामानात उद्भवणाऱ्या आव्हानांचाही सामना ते करत आहेत.

5 फूट बर्फवृष्टीमध्येदेखील गस्त -

भारतीय लष्कर नेहमीच कठीण परिस्थितीतही शत्रूचा पराभव करते. लष्कर आणि आयटीबीपीच्या जवानांनी अदम्य साहस आणि पराक्रमाने भारताची सीमा अभेद्य केली आहे. विशेषत: हिमालयाच्या उंच भागात बर्फवृष्टीमुळे पारा उणेपर्यंत घसरतो. तेव्हाही भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान 5 फूट बर्फवृष्टीमध्येही गस्त घालतात.

लिपुलेख सीमेवर महिला सैनिकही तैनात -

लिपुलेख सीमेवर 10 हजार ते 17 हजार फूट उंचीवर ITBP चे हिमवीर रात्रंदिवस भारतीय सीमेवर पाळत ठेवत आहेत. युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हे सैनिक विषम भौगोलिक परिस्थितीतही कठोर प्रशिक्षण घेत आहेत. आयटीबीपीने येथे पुरुष सैनिकांसह महिला सैनिकही तैनात केले आहेत. शत्रूचा खंबीरपणे सामना करण्यासाठी महिला सैनिकही पूर्णपणे सज्ज आहेत.

6 महिने बर्फ आणि तापमान -

भारत-चीन सीमा वर्षातील जवळजवळ 6 महिने पूर्णपणे बर्फाने झाकलेली असते. ITBP कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्या सेवेचा एक मोठा भाग उणे -45 अंश सेल्सिअस तापमानात धोकादायक हिमनद्या आणि अदृश्य नैसर्गिक धोक्यांमध्ये थंड हिवाळ्यात घालवतात.

म्हणून आयटीबीपीच्या जवानांना हिमवीर म्हणतात -

सीमेच्या पलीकडे शेजारी देश शक्तिशाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. कठीण प्रसंग कधीही उद्भवू शकतो. म्हणून फोर्स अपडेट केले जाते. कमी ऑक्सिजन, जास्त उंची आणि आव्हानात्मक हवामानात शत्रूवर लक्ष ठेवणे अत्यंत आव्हानात्मक आहे. म्हणूनच आयटीबीपीच्या जवानांना हिमवीर असेही म्हणतात.

सीमा रक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीही -

लिपुलेख सीमेवर तैनात आयटीबीपीच्या 7 व्या कोरचे जवान कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान सीमेचे रक्षण करतात तसेच यात्रेकरूंची काळजी घेतात. इतकेच नाही तर हिमालयाच्या उंच भागात अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुटकेसाठी आयटीबीपी वेळोवेळी मोहीम राबवते. आयटीबीपी सीमेवरील नागरिकांना आरोग्य आणि इतर आवश्यक सुविधा देखील पुरवते.

हेही वाचा - IPL Auction 2022 Live Updates : जाणून घ्या, कोणत्या खेळाडूची किती किंमत...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.