ETV Bharat / bharat

Martyred On China Border: आयटीबीपी असिस्टंट कमांडंट टिकम सिंह नेगी चीन सीमेवर शहीद, आज डेहराडूनमध्ये अंत्यसंस्कार होणार

author img

By

Published : Apr 4, 2023, 9:00 AM IST

Updated : Apr 4, 2023, 9:21 AM IST

उत्तराखंडच्या शूर सुपुत्राने देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे. पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवर तैनात असलेले टिकम सिंह नेगी एका मिशनदरम्यान शहीद झाले आहेत. टिकम सिंह नेगी यांनी आयटीबीपीमध्ये असिस्टंट कमांडंट पद भूषवले होते.

ITBP Assistant Commandant Tikam Singh
असिस्टंट कमांडंट टिकम सिंग नेगी

डेहराडून : 3 एप्रिल रोजी चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना उत्तराखंडमधील आणखी एक जवान शहीद झाला. डेहराडूनचा रहिवासी टिकूम सिंह नेगी पूर्व लडाखच्या उत्तरी उप-सेक्टरमध्ये तैनात होते. एका विशेष मोहिमेदरम्यान ते शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव आज दुपारी बारा वाजता डेहराडूनला आणण्यात येणार आहे. शहीद टिकम सिंह नेगी यांच्यावर आज पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विशेष मिशनवर तैनात : मिळालेल्या माहितीनुसार, टिकम सिंह नेगी यांचे कुटुंब डेहराडून जिल्ह्यातील राजावाला सहसपूर येथे राहते. शहीद टिकम सिंह नेगी यांनी आयटीबीपीमध्ये असिस्टंट कमांडंट पद भूषवले होते. सध्या त्यांची पोस्टिंग पूर्व लडाखच्या उत्तरेकडील उप-सेक्टरमध्ये होती. यावेळी ते भारत-चीन सीमेवर एका विशेष मिशनवर तैनात होते, परंतु 3 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांनी फोनवरून टिकम सिंह नेगी यांच्या शहीद झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.

संपूर्ण कुटुंबात शोक : या संदर्भात विकासनगरचे एसडीएम विनोद कुमार म्हणाले की, त्यांचे वडील आरएस नेगी यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. शहीद टिकम सिंह नेगी यांचे वडील आरएस नेगी हेही लष्करातून निवृत्त झाले आहेत. शहीद टिकम सिंह नेगी सध्या डेहराडून जिल्ह्यातील सहसपूर तालुक्यातील राजावाला येथे राहतात. मुलाच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत.

अतिरेक्यांनी सैन्यावर गोळीबार केला : जम्मू -काश्मीरमध्ये फेब्रुवारीमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत जवानांनी एका अतिरेक्याला ठार मारले होते. सैन्याचा एक जवान या चकमकीत शहीद झाला होता. लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक संशयित ठिकाणी पोहोचले होते. तेव्हा लपलेल्या अतिरेक्यांनी सैन्यावर गोळीबार केला आणि चकमक सुरू झाली होती. लष्कराच्या दोन जवानांना या गोळीबारात गोळ्या लागल्या होत्या.

हेही वाचा : Padgampora Encounter : जम्मू - काश्मीरमध्ये चकमकीत एक अतिरेकी ठार, एक जवान शहीद

Last Updated : Apr 4, 2023, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.