ETV Bharat / bharat

Chandrayaan 3 : विक्रम लँडर आज चंद्रावर उतरणार, मोहीम यशस्वी होण्यासाठी जगभरातून भारतीयांची प्रार्थना - ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन

चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर आज सायंकाळी चंद्रावर सॉफ्ट लँडींग करणार आहे. त्यामुळे चंद्रयान 3 यशस्वी होण्यासाठी जगभरातून प्रार्थना, आरती आणि होमहवन करण्यात येत आहे.

Chandrayaan 3
Chandrayaan 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 10:34 AM IST

नवी दिल्ली : इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेचं आज चंद्रावर सॉफ्ट लँडींग करण्यात येणार आहे. त्यासाठी जगभरातील नागरिकांच्या नजरा इस्रोच्या मोहिमेकडं लागल्या आहेत. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी नागरिक प्रार्थना करत आहेत. देशभरातील सगळे नागरिक धार्मीक बेड्या तोडून चंद्रयान 3 मोहिमेसाठी एकत्र येत आहेत. ऋषिकेश, वाराणसी, प्रयागराज, वडोदरा यासह अमेरिकेतही चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी होमहवन, प्रार्थना आणि नमाज अदा करण्यात येत आहेत.

सर्वधर्मीय नागरिकांची प्रार्थना : इस्रोचं चंद्रयान 3 आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडींग करणार आहे. चंद्रयान 3 च्या यशस्वीतेसाठी आज नागरिक विविध धार्मीक स्थळांवर प्रार्थना करत आहेत. ऋषिकेशमधील परमार्थ निकेतनपासून ते अमेरिकेपर्यंत विविध देशातील नागरिकही चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना आणि पूजा अर्चा करत आहे. सर्वधर्मीय नागरिक चंद्रयान 3 च्या यशासाठी प्रार्थना करत आहेत.

  • #WATCH | Tamil Nadu | Priests from Rameswaram Agni Theertham Priests Welfare Association offer prayers at the Agni Theertham beach for the successful lunar landing of Chandrayaan-3. pic.twitter.com/stZFNooQlX

    — ANI (@ANI) August 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चंद्रयान 3 मोहिमेसाठी गंगा आरती : चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन घाटावर गंगा आरती करण्यात आली. यावेळी गंगा आरतीत सहभागी झालेल्या भाविकांनी हातात तिरंगा घेऊन चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. त्यासह विविध धार्मीक कार्यक्रमाचं आयोजनही ऋषिकेशमध्ये करण्यात आलं. आरतीपूर्वी भाविकांनी गंगेच्या परमार्थ निकेतन घाटावर पूजा केली. परमार्थ निकेतन घाटाचे आध्यात्मिक गुरु स्वामी चिदानंद मुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरती करण्यात आली. यावेळी स्वामी चिदानंद मुनी यांनी वेदांपासून विज्ञानापर्यंत जग आपल्याला मान्यता देत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे भारत दक्षिण ध्रुवावर आपला झेंडा फडकावेल, असा विश्वास स्वामी चिदानंद मुनी यांनी व्यक्त केला.

दिल्ली, भुवनेश्वर, वाराणसी, प्रयागराजमध्ये प्रार्थना : चंद्रयान 3 मोहिमेसाठी देशभरातील नागरिक विविध ठिकाणी पूजा आणि प्रार्थना करत आहेत. यात दिल्ली, वाराणसी, भुवनेश्वर, प्रयागराज येथील नागरिकांनी चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अलिगंज येथील हनुमान मंदिरात जमलेल्या भाविकांनी चंद्रयान यशस्वी होण्यासाठी आरती केली आहे. वडोदरातील तरुणांनीही चंद्रयान 3 यशस्वी होण्यासाठी आरती केली आहे.

  • #WATCH | Uttarakhand: A special Ganga Pujan was performed today at the Haridwar by Mata Vaishno Devi Cave Yoga Temple Tapkeshwar Mahadev Dehradun for the successful landing of Chandrayaan- 3. pic.twitter.com/zYKihjj2kJ

देशातील 140 कोटी नागरिकांच्या आशा आणि समर्पण : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये भाविकांनी मोठ्या जल्लोषात मंत्रोच्चारासह प्रार्थना केली. यावेळी चंद्रयान 3 चं पोस्टर हातात घेत भाविकांनी इस्रोची मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी अध्यात्मिक गुरू पंडित धिरशांत दास यांनी चंद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील 140 कोटी नागरिकांच्या आशा, समर्पण आणि कठोर परिश्रम या मोहिमेत गुंतल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

लखनऊमध्ये केली नमाज अदा : चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी लखनऊ येथील इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी नमाज अदा करण्यात आली. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी देशातील नागरिकांचं आणि चंद्रयान 3 मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचं अभिनंद करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

  • #WATCH | Madhya Pradesh | A large number of devotees arrive at Bageshwar Dham in Chhatarpur, to offer special prayers for the successful lunar landing of Chandrayaan-3.

    A devotee, Rajiv Sharma says, "Thousands of devotees have come here to offer prayers..."

    Another devotee,… pic.twitter.com/qOGRodloBO

अमेरिका आणि व्हर्जिनियात होमहवन : चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी इंडो अमेरिकन नागरिकांनी होम हवन केलं. यावेळी विदेशात स्थायिक झालेल्या नागरिकांनी 'अभिषेकम' हा धार्मीक विधी केला. व्हर्जिनिया येथील मंदिरात होम हवनही करण्यात आला. व्हर्जिनिया येथील मंदिरातील भाविकांनी मोठ्या उत्साहात चंद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी मधू राममूर्ती यांनी माझी बंगळुरूमध्ये कंपनी असून ती संरक्षण क्षेत्रात लागणारी सामग्री बनवत असल्याचं स्पष्ट केलं. तर चंद्रयान 3 मोहिमेबाबत आपल्याला अभिमान वाटत असल्याचं राधिका नारायण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चंद्रयान 3 यशस्वी होण्यासाठी नागरिकांसह शास्त्रज्ञांना शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 Live Updates : विक्रम लँडरच्या 'सॉफ्ट लँडींग'ची जगभरात उत्सुकता, इस्रोच्या यशासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना
  2. Chandrayaan 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंगसाठी 'विक्रम'समोर अनेक आव्हानं, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.