ETV Bharat / bharat

Darjeeling News : दार्जिलिंगच्या हॉटेलमध्ये इस्रायली नागरिकाचा मृतदेह सापडला

पश्चिम बंगालमधील हॉटेलमध्ये एक इस्रायली नागरिक मृतावस्थेत आढळला ( Israeli citizen found dead ). घटना दार्जिलिंगमधील एका हॉटेलमधील ( Darjeeling Hotel Room ) आहे. 27 सप्टेंबर रोजी इस्त्रायली नागरिक तेथे पोहोचला होता.

Israeli Dead
इस्रायली नागरिकाचा मृतदेह
author img

By

Published : Sep 30, 2022, 7:10 PM IST

दार्जिलिंग : गुरुवारी सकाळी एक इस्रायली नागरिक त्याच्या हॉटेलच्या खोलीत ( Darjeeling Hotel Room ) मृतावस्थेत आढळून आला. 29 वर्षीय नॅथन लेव्ही असे या परदेशी नागरिकाचे नाव असून, तो 27 सप्टेंबर रोजी दार्जिलिंग हिल्समधील संदकफू येथे पोहोचला होता आणि हॉटेल शेर्पा चलेटमध्ये थांबला होता. ( Israeli citizen found dead )

पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे : दार्जिलिंगचे जिल्हा दंडाधिकारी एस पोनम्बलम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की इस्रायलमधील एका परदेशी नागरिकाचा आज संडाकफू येथे मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे.

प्राथमिक तपासात हा नैसर्गिक मृत्यू : त्याची माहिती गृहविभागालाही पाठवण्यात आली असून तेथून यासंदर्भात दूतावासाला कळवण्यात येईल, असेही ते म्हणाले. प्राथमिक तपासात हा नैसर्गिक मृत्यू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. "परंतु शवविच्छेदन आणि इतर औपचारिकता बाकी असल्याने आम्ही या टप्प्यावर निर्णायकपणे काहीही सांगू शकत नाही," पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.