ETV Bharat / bharat

Israel Palestine War 2023 : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धानं जागतिक शांततेचा खेळखंडोबा; हमासचा कसा झाला उदय - israel palestine conflict reason

Israel Palestine War 2023 : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धानं जागतिक शांततेचा भंग झाल्याचं सध्या दिसून येतंय. हमासचा उदय झाल्यानंतर यापूर्वीही अनेकदा संघर्षाचे खटके उडाले आहेत. मात्र यावेळी एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे इस्रायल पॅलेसाईनमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे. हे लवकरात लवकर थांबणं जागतिक शांततेसाठी गरजेचं आहे.

Israel Palestine War 2023
Israel Palestine War 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 1:49 PM IST

Updated : Oct 16, 2023, 6:58 PM IST

हैदराबाद Israel Palestine War 2023 : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष काही नवा नाही. आता त्यांच्यातील युद्धाला तोंड फुटलं आहे. त्यामध्ये केवळ 360 चौरस किलोमीटरच्या गाझा शहराला त्याचा मोठा फटका बसत आहे. या शहराची लोकसंख्या फक्त 2० लाख ३० हजाराच्या आसपास आहे. इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात असंख्य मुले आणि महिलांना लक्ष्य केलं जात आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं पश्चिम आशियातील हा हिंसाचार थांबवण्यासाठी, स्वतंत्र, सार्वभौम पॅलेस्टाईनची स्थापना, शांतता वाटाघाटीद्वारे करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

निरपराधांच्या रक्तात हिंसेचं बीजारोपण - सामूहिक विनाशकारी शस्त्रे मानवतावादावर उठतात एवढंच नाही तर सुसंवादालाही खोडा घालतात. यातून निरपराधांच्या रक्तात हिंसेचं बीजारोपण होतं, ते योग्य नाही. पश्चिम आशियाई प्रदेशातील संघर्षाची सध्याची लाट या भीषण वास्तवाचा धगधगता पुरावा आहे. हमासच्या अतिरेक्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याचा बदला म्हणून, इस्रायलनं गाझाच्या विनाशाचा जणु विडाच उचलल्याचं दिसतं. केवळ 360 चौरस किलोमीटरच्या गाझा शहराला त्याचा मोठा फटका बसत आहे. या शहराची लोकसंख्या फक्त 2.3 दशलक्ष आहे. इस्रायली सैन्यानं गाझामधील लोकांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा त्यांचा हेतू नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, असंख्य अजाण मुले आणि स्त्रियांना त्यांचा असह्य त्रास सहन करावा लागत आहे, हेही वास्तव आहे.

विनाशकारी संघर्षाच्या छायेत - इस्रायलनं एवढ्या प्रचंड कारवाईचा इशारा दिला की, उत्तर गाझामधील अकरा दशलक्ष पॅलेस्टिनींना त्यांनी केवळ 24 तासांत घरं रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जे काही हाताला लागेल ते घेऊन त्यांना पळून जाणं भाग पडलं. या विनाशकारी संघर्षाच्या छायेत सामान्य नागरिकांची अक्षरशः दुर्दशा होत आहे. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या प्रलयकारी घटनांची ठिणगी कुणी पेटवली ते पाहावं लागेल. ज्यातून थेट युद्धाच्या हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे.

सांप्रदायिक सरकारचा जन्म - इस्रायलच्या सरकार विषयी बोलायचं झालं तर, बेंजामिन नेतन्याहू पंतप्रधानपदावर डिसेंबर 2022 मध्ये आले. निवडणूक विजयासाठी त्यांनी अतिउजव्या अतिरेकी गटांच्या पाठिंब्याचा उपयोग केला. त्यामुळे देशाच्या इतिहासातील सर्वात सांप्रदायिक सरकारचा जन्म झाला. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्त्यांमध्ये अनेक वर्णद्वेषी व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांच्या मनात पॅलेस्टिनी अस्तित्वाप्रती अजिबात आत्मियता नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे इस्रायलींनी वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमवर आक्रमणाची बीजे पेरली गेली. फक्त जून महिन्यात पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध जाळपोळीसह अंदाजे 310 हल्ले झाले. तर या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात वेस्ट बँकमधील 200 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांना जीव गमावावा लागला. इस्रायलचे विरोधी पक्षनेते बेनी गँट्झ यांनीही या हिंसाचाराचा निषेध केला नाही. तसंच त्यापासून कुणालाच परावृत्त केलं नाही. एवढंच नाही तर, ज्यू राष्ट्रवादाच्या ताणातून हे सगळं घडल्याचं ते म्हणाले.

हमासची उत्पत्ती - यातून नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायली सरकार पॅलेस्टिनींच्या मनात विष कालवत असल्याचं दिसतं. त्याचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागू शकतात, असा अंदाज होताच. खेदाची गोष्ट म्हणजे आता हे खरं होताना दिसत आहे. कारण आताच्या संघर्षात अनेक सर्वसामान्य नागरिकांचं जीवन क्रूरपणे उद्ध्वस्त होत आहे. हमासची निर्मिती कशी झाली याची पाळंमुळं यापूर्वीच्या अनेक अत्याचारांच्या घटनेत शोधता येतील. इस्रायलमधील अत्याचार आणि अनेक इस्रायली लोकांचं अपहरण करण्यासाठी जबाबदार हमास आहे. हमासची उत्पत्ती ऐतिहासिक, राजकीय आणि प्रादेशिक घटकांच्या गुंतागुंतीच्या घटनांमधून उलगडते. या संघर्षाची मूळ कारणे अशांत इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. इस्रायलच्या वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि गाझा पट्टीचं सामीलीकरण सुमारे ५५ वर्षांपूर्वी झालं. त्यातून या प्रदेशात प्रदीर्घ संघर्षाची स्थिती निर्माण झाली. माझं-तुझं या वादात पॅलेस्टाईनच्या यासर अराफात यांनी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनने (पीएलओ) च्या माध्यमातून गनिमी युद्धाची मोहीम सुरू केली. पीएलओच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या भूमिकेतून त्यांनी सुरुवातीला स्व-निर्णयाची मागणी केली. तथापि, जसजसा वेळ जात गेला तशी ही भूमिका अराजकतेला जन्म देणारी ठरली.

हिंसक प्रतिकार करण्याची भूमिका - नंतर इस्रायलनं अराफात यांच्या नेतृत्वाविरुद्ध सर्वांना एकत्र केलं. पॅलेस्टिनी समुदायात फूट पाडण्याच्या इस्रायलच्या धोरणाचा थेट परिणाम म्हणून हमासचा उदय झाला. एकीकडे अराफात यांच्या पीएलओ निःशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांनी जोर धरला होता. त्यासाठी पॅलेस्टिनी मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर उठवण्यासाठी ते सक्रियपणे राजकीय प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे हमासनं हिंसक प्रतिकार करण्याची भूमिका घेतली. हळूहळू, हमासला स्थानिक समर्थन मिळत गेलं. इस्रायलचा विचार करता त्यांच्या दृष्टीनं ही गोष्ट घातक बनत गेली. यात हिजबुल्ला आणि इतर इस्लामिक जिहादी संघटनांशी त्यांचं सूत जुळलं. तर इस्रायलचा पारंपरिक शत्रू इराणनेही देशाला लक्ष्य केलं.

इस्रयलची वर्चस्ववादी वृत्ती - मात्र मध्यपूर्वेतील गतिशीलता कालांतराने बदलत गेली. अनेक अरब देश इस्रयलशी संबंध सुधारू इच्छित आहेत. त्याचबरोबर, इस्रायलने, अमेरिकेच्या पाठिंब्याने, पॅलेस्टिनी प्रश्नाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं आहे. 1967 च्या युद्धादरम्यान अधिग्रहित केलेल्या प्रदेशातून माघार घेण्याचं आवाहन करणाऱ्या भूमिकेला त्यातून हरताळ फासला गेला. त्यातूनच निर्माण झालेली इस्रयलची वर्चस्ववादी वृत्ती स्वतःची सुरक्षा धोक्यात आणत आहे, हेच आताच्या संघर्षातून दिसतं.

युद्धाची आग विझवणार का - गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ युक्रेनमध्ये रशियाच्या घुसखोरीमुळे संघर्ष सुरू आहे. या जागतिक संकटात इस्रायलमधील वाढत्या संघर्षाची भर पडली आहे. ही परिस्थिती आपल्याला आणखी धोकादायक वळणावर नेत आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं घेतलेल्या भूमिकेनुसार पश्चिम आशियातील हा न संपणारा हिंसाचार थांबवण्यासाठी, शांतता वाटाघाटीद्वारे स्वतंत्र, सार्वभौम पॅलेस्टाईनची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. इस्रायल या आवाहनाकडे लक्ष देईल का आणि असं केल्याने केवळ या प्रदेशालाच नव्हे तर संपूर्ण जगालाही वेठीस धरणाऱ्या युद्धाची आग विझवणार का, हा खरा प्रश्न आहे.

हेहा वाचा

  1. India Arab Ties : इस्रायल- हमासच्या युद्धाचा भारत-अरब संबंधांवर काय होणार परिणाम? वाचा तज्ज्ञांच मत
  2. Israel Hamas hate crime : इस्रायल-हमास युद्धानं 71 वर्षीय वृद्ध संतप्त, अमेरिकेत मुलाची हत्या करून महिलेवर केले चाकूचे वार
  3. Indian origin killed in Hamas attack : हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या दोन इस्रायली महिला सुरक्षा अधिकारी ठार

Last Updated : Oct 16, 2023, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.