ETV Bharat / bharat

IAS Officer Molestation : महिला IAS अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी IRS अधिकाऱ्याला अटक - दिल्लीत महिला IAS अधिकाऱ्याचा विनयभंग

भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग आणि धमकावल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी भारतीय महसूल सेवेचा (IRS) अधिकारी सोहेल मलिक याला अटक केली आहे.

IAS Officer Molestation
महिला IAS अधिकाऱ्याचा विनयभंग
author img

By

Published : May 20, 2023, 9:08 PM IST

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत महिला IAS अधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका IRS अधिकाऱ्याला अटक केली आहे. महिला आयएएस अधिकाऱ्याचा आरोप आहे की, आरोपी तिला जवळपास 3 वर्षांपासून त्रास देत होता. माहितीनुसार, कोरोनाच्या काळात महिला आयएएस अधिकाऱ्याची ड्युटी लागली होती. या दरम्यान आरोपीची पीडितेसोबत ओळख झाली. तेव्हापासून तो तिला सतत त्रास देत होता.

बऱ्याच काळापासून त्रास देत होता : पीडित आयएएस ऑफिसरने आरोप केला आहे की, आरोपी तिला खूप दिवसांपासून भेटण्यासाठी दबाव टाकत होता. तिने त्याला अनेक वेळा समजावून सांगून ताकीदही दिली होती. असे असूनही तो ते ऐकता तिला वारंवार फोन करत होता. यानंतर महिला अधिकाऱ्याने पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग, पाठलाग आणि धमकावल्याची तक्रार केली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अधिकाऱ्याला अटक केली आहे. सोहेल मलिक असे आरोपीचे नाव आहे. तर महिला अधिकारी केंद्रीय मंत्रालयात सहसचिव पदावर कामाला आहेत. विशेष म्हणजे पीडित आयएएस ऑफिसरचा पतीही एक आयएएस अधिकारी आहे.

महिला आयएएस अधिकाऱ्याला धमकावले : पीडित महिला अधिकाऱ्याने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपींच्या कृत्यामुळे तिला कार्यालयात काम करणे कठीण झाले होते. तो नेहमी फोन करून, भेटण्यासाठी दबाव टाकून तिला त्रास देत असे. तसे न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि पीडितेची बदनामी करण्याची धमकीही तो देत असे. यामुळे व्यथित होऊन अखेर महिला अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

  1. UP Crime News : आधी प्रेमाच्या जाळ्यात फसवले, मग धर्मांतर करून केला विकण्याचा प्रयत्न ; पोलिसांकडून टोळीचा भंडाफोड
  2. Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मुंबई विमानतळ कस्टम्सने केली भारतीय नागरिकाला अटक; २.२८ कोटी रुपयांचे केले सोने जप्त
  3. Honey Trap Case : ज्या कारागृहात उद्घाटन केले, त्याच कारागृहात कैदी झाले प्रदीप कुरुलकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.