ETV Bharat / bharat

स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी तेलंगाणात मराठीत वर्क साईट स्कूल उपक्रम; IPS महेश भागवत यांचा पुढाकार

स्थलांतरित झालेल्या लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, हैदराबादमधील रचकोंडा विभागाचे मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh M Bhagwat) यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, अशा विद्यार्थ्यांसाठी रचकोंडा विभागात मराठी आणि ओडिशा भाषांमध्ये वर्क साईट शाळा (Work Site School) सुरू केल्या आहेत. वीटभट्ट्यांवर किंवा मोजमुजरी करणाऱ्या मुलांना याचा फायदा होणार आहे.

CP MahCP Mahesh Bhagwatesh Bhagwat
महेश भागवत यांच्याहस्ते वर्क साईट शाळांचे उद्घाटन
author img

By

Published : Feb 5, 2022, 6:36 PM IST

हैदराबाद - कामानिमित्ताने पालक मुलाबाळांसह आपलं घरदार सोडून परराज्यांमध्ये स्थलांतर करत असतात. याचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर झाल्याचे पाहायला मिळते. भाषेचा मेळ आणि ग्रामीण भागांमधील शाळांची अडचण यामुळे स्थलांतरित झालेल्या लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, हैदराबादमधील रचकोंडा विभागाचे मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh M Bhagwat) यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत, अशा विद्यार्थ्यांसाठी रचकोंडा विभागात मराठी आणि ओडिशा भाषांमध्ये वर्क साईट शाळा (Work Site School) सुरू केल्या आहेत. वीटभट्ट्यांवर किंवा मोजमुजरी करणाऱ्या मुलांना याचा फायदा होणार आहे. बालमजुरी थांबवणे आणि त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यामागचे उद्दिष्ट असल्याचे महेश भागवत यांनी सांगितले.

CP Mahesh Bhagwat
महेश भागवत यांच्याहस्ते वर्क साईट शाळांचे उद्घाटन

मेडचल जिल्ह्यातील चेरियाल आणि थिम्मयपल्ली या गावांमध्ये मराठी आणि ओडिशा भाषांमध्ये वर्क साईट शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन आज (5 फेब्रुवारी) आयपीएस महेश भागवत यांच्याहस्ते करण्यात आले आहे. Aide et Action international यांच्या संगनमताने या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

  • तेलंगाणात मराठी भाषेत वर्क साईट शाळा सुरू -

महाराष्ट्रातील अनेक स्थलांतरित कामगार मोलमजुरी किंवा वीटभट्ट्यांवर कामानिमित्ताने तेलंगाणातील अऩेक भागांमध्ये येत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांसाठी तात्पुरती शाळा सुरू करण्याचा उपक्रम राबवण्यात आली. मराठी भाषिक कामगारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्या मुलांसाठी मराठी भाषेत वर्क साईट शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जेणेकरून ही मुलं मराठीत शिक्षण घेऊ शकणार आहेत.

  • काय आहे उपक्रम?

यावेळी बोलताना महेश भागवत म्हणाले की, रचकोंडा पोलीस आयुक्तालयाने २०१७ मध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन स्माइल'च्या अंतर्गत हा वर्क साईट स्कूळ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. स्थलांतरित झालेल्या बालमजुरांना आपआपल्या भाषेत शिक्षण मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच वीटभट्ट्यांवर मजुरी करणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याचे काम या शाळांच्या माध्यमातून केले जाणार आहे. स्थलांतरित हंगाम संपल्यावर सर्व स्थलांतरित मुले पुन्हा आपआपल्या राज्यात गेल्यावर त्यांना त्यांच्याच भाषेत पुढे शिक्षण घेता येईल, यासाठी वर्क साईट स्कूलची संकल्पना सुरू केल्याचे महेश भागवत यांनी सांगितले. वीटभट्टीवर काम करण्यासाठी पालकांसोबत आलेल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुलांसाठी थिम्मयापल्ली येथे प्रथमच मराठी भाषेतील वर्क साईट स्कूलची स्थापना करण्यात आली.

  • मराठी आणि ओडिशा भाषांमध्ये वर्क साईट शाळा सुरू -

ओडिशातील स्थलांतरित कामगार डिसेंबरमध्ये पाच महिन्यांसाठी वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी त्यांच्या मुलांना घेऊन येतात. त्यामुळे पालकांसोबत ही मुलेदेखील वीटभट्ट्यांवर काम करतात. त्यामुळे पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते.. त्यामुळे अशा कामांपासून मुलांना दूर ठेवत त्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही तीन वर्षांपूर्वी वर्क साईट स्कूल संकल्पना मांडली होती. तेव्हापासून ती यशस्वीपणे चालवत आहोत, असे पोलीस आयुक्त महेश भागवत म्हणाले.

  • रचकोंडा पोलिसांचा उपक्रम -

रचकोंडा पोलीस आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, Aide et Action international आणि वीटभट्टी मालक यांच्या पुढाकाराने स्थलांतरित मुलांचे शिक्षण आणि बाल संगोपन करणे शक्य झाले. अनेक भागातील बालकामगारांना शोधणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे हे आमच्यासाठी आव्हान होते. वर्क साईट स्कून उपक्रमामुळे अनेक वीटभट्ट्यांना बालमजुरीपासून मुक्त करण्यात यश आले आहे. सुमारे 3 हजार मुलांनी या शाळांचा वापर केला आहे. असे महेश भागवत यांनी सांगितले. यावेळी महेश भागवत यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, वीटभट्टी मालक आणि या उपक्रमासाठी काम करणाऱ्या एनजीओंचे कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.