हैदराबाद : हैदराबादच्या सायबराबाद पोलिसांनी ऑनलाइन आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश करत 10 बुकींना अटक केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान सोमवारी बच्चुपली येथील एका घरावर छापा टाकून ही अटक करण्यात आली.
10 बुकींना अटक : या प्रकरणी सायबराबादचे पोलिस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी पत्रकारांना सांगितले की, 'एसओटी बालानगर झोन आणि सायबराबाद पोलिसांची बच्चुपाली टीम क्रिकेट बेटिंग रॅकेटच्या बेकायदेशीर कारवायांवर लक्ष ठेवून होती. विश्वसनीय माहितीच्या आधारे त्यांनी संयुक्तपणे साई अनुराग कॉलनी, बच्चुपली येथील एका घरावर छापा टाकला. ते पुढे म्हणाले की, '10 बुकींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 60.39 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
एक कोटी रुपयांची मालमत्ता जप्त : अटक करण्यात आलेल्या लोकांच्या बँक खात्यातील रक्कम, ऑनलाइन रोकड आणि जप्त केलेल्या मालमत्तेचा समावेश करून या प्रकरणी जप्त करण्यात आलेली एकूण रक्कम एक कोटी रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. जप्त केलेल्या मालमत्तेत 3 लाईन बोर्ड, 8 लॅपटॉप, टी टीव्ही, 8 कीपॅड फोन, 2 सीपीयू कीबोर्ड, मॉनिटर सेट टॉप बॉक्स, हेडसेट, वायफाय राउटर, प्रिंटर, मायक्रोफोन, 10 स्मार्ट फोन आणि 3 दुचाकींचा समावेश आहे.
आरोपी आंध्र प्रदेशाचे निवासी : तेलंगणा गेमिंग कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत बुकींना अटक करण्यात आली आहे. विजयवाडा येथील रहिवासी असलेला पांडू हा फरार आहे. अटक करण्यात आलेले चार जण आंध्र प्रदेशातील असून उर्वरित फरारी देखील आंध्र प्रदेशातीलच आहेत. पोलिसांनी सांगितले की, झटपट पैसे कमवण्यासाठी काही लोक क्रिकेट सट्टेबाजीकडे वळतात आणि लवकरच त्यांना याची सवय होते. सट्टेबाज त्यातून पैसे कमावतात तर गुंतवणूकदारांचे पैसे मात्र बुडतात.
हे ही वाचा : CSK Ban In IPL : सीएसकेवर बंदी घाला; या आमदाराची विधानसभेत अजब मागणी, 'हे' आहे कारण