ETV Bharat / bharat

Terror Attacks In Rajour : राजौरी दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे -अमित शाह

जम्मू- काश्मीरच्या राजौरी येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार (दि. 13 जानेवारी) सांगितले आहे. संपूर्ण सुरक्षाजाळे असलेल्या नव्या कृती आराखड्यासह सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणतीही कमी राहणार नाही अस आश्वासनही त्यांनी जम्मू भागातील नागरिकांना यावेळी दिले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे सुरक्षा बैठक

author img

By

Published : Jan 14, 2023, 9:13 AM IST

नवी दिल्ली : गाव संरक्षण रक्षक बळकट करण्याचा १ व २ जानेवारीला ढांगरी येथे झालेल्या दुहेरी हल्ल्यांशी काहीही संबंध नाही, कारण या स्वयंसेवकांना सक्षम करण्याचा निर्णय गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच घेण्यात आला होता याबाबतही गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी भाष्य केले आहे. या हल्ल्यांत ७ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. १ जानेवारीला दहशतवाद्यांच्या गोळीबारात ५ जण मारले गेले होते. तर, दुसऱ्या दिवशी झालेल्या आयईडीच्या स्फोटात दोन मुलांनी जीव गमावला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक : केंद्र सरकारने या दोन्ही घटनांशी संबंधित प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपवला आहे. गेल्या दीड वर्षांत जम्मू भागात झालेल्या इतर सर्व दहशतवादी घटनांसह या प्रकरणाचा तपास एनआयए व जम्मू पोलीस संयुक्तपणे करतील, अशी माहितीही शहा यांनी यावेळी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे सुरक्षा बैठक झाली. यावेळी उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव एके भल्ला, आयबीचे प्रमुख आणि रॉचे प्रमुख यांच्यासह सीआरपीएफ, बीएसएफ तसेच पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

कधी घडली होती घटना : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सोमवार (दि. 1, 2 जानेवारी)रोजी डांगरी गावात झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमध्ये दोन मुलांसह सात हिंदू नागरिक ठार झाले. तर यामध्ये अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यांनंतर 2,000 हून अधिक निमलष्करी दल राजौरीमध्ये पाठवण्यात आले आहेत. आता या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)कडे देण्यात आला आहे. सरकारने राजौरीतील ग्राम संरक्षण समितीचे पुनरुज्जीवन केले आहे. तसेच, संभाव्य दहशतवादी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांना नवीन रायफलही देण्यात येत आहेत.

मृतांची नावे : अधिकाऱ्याने सांगितले की, सतीश कुमार (45), दीपक कुमार (23), प्रीतम लाल (57) आणि शिशुपाल (32) अशी मृतांची नावे आहेत. ते म्हणाले की, पवन कुमार (38), रोहित पंडित (27), सरोज बाला (35), रिदम शर्मा (17) आणि पवन कुमार (32) अशी जखमींची नावे आहेत. राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मेहमूद यांनी गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. डांगरीचे सरपंच धीरज कुमार यांनी सांगितले की, संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज आला आणि नंतर मला फोनवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहितीही मिळाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.