म्हैसूर ( कर्नाटक ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की योगामुळे समाजात शांतता येते. कर्नाटकातील म्हैसूर शहरात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "या आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज सर्व भागात योगाचा सराव केला जात आहे. योग आपल्यासाठी शांती आणतो. योगामुळे मिळणारी शांती केवळ व्यक्तींसाठीच नाही तर ती आपल्या राष्ट्रांना आणि जगाला शांती आणते. योग हा केवळ कोणा एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम 'मानवतेसाठी योग' आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "हे संपूर्ण विश्व आपल्या शरीरापासून आणि आत्म्यापासून सुरू होते. विश्वाची सुरुवात आपल्यापासून होते. आणि, योग आपल्याला आपल्यातील प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतो आणि जागरूकतेची भावना निर्माण करतो," ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील म्हैसूर शहरातून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ( international yoga day 2022 ) आयोजित सोहळ्यात सहभागी झाले आहेत. म्हैसूर पॅलेस मैदानावर पंतप्रधानांसह 15,000 हून अधिक लोक योग सोहळ्यात सहभागी ( PM Modi Mysuru Yoga Day Program ) झाले आहेत. योग्य ऊर्जा आज सर्वांना आधार देत आहे. योग्य मानवाला निरोगी आरोग्याचा विश्स्वास देत आहे. जगभरात योग साजरा केला आहे. योग्य दिवसाचा उत्साह आहे. योग संपूर्ण मानवतेसाठी आहे. त्यामुळे यावेळी आंतरराष्ट्रीय योग्य दिवसाची थीम मानवतेसाठी योगा आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
या वर्षी उत्सवाची थीम "मानवतेसाठी योग" आहे. ही थीम खूप विचारविनिमय/मसलत केल्यानंतर निवडली गेली आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांची व्यापक थीम ठेऊन आयुष मंत्रालयाने योग दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसाठी 75 ठिकाणे निश्चित केली आहेत. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हैसूरहून पंतप्रधानांसोबत सहभागी झाले आहेत. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोईम्बतूर येथील IAF तळावर योगासने करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत योगासने करत आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर दिल्लीतील पुराण किला येथे उपस्थित राहणार आहेत तर शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी प्रतिष्ठित लाल किल्ल्यावर उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी हैदराबादमधील हुसेन सागर तलावातून योग सोहळ्यात सामील होतील तर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर हमीरपूरमध्ये उपस्थित असतील. कायदा मंत्री किरेन रिजिजू अरुणाचल प्रदेशातील डोंग गावात योगासने करणार आहेत तर अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे पुरी समुद्रकिनाऱ्यावरून योग सोहळ्यात सामील होतील. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ओडिशातील कोणार्क येथील सूर्य मंदिरात, अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथे, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे उपस्थित राहणार आहेत. गुजरात, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हंपी येथे, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ग्वाल्हेर किल्ल्यावर, रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपुरातील झिरो माईलस्टोन येथे आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जैसलमेरमधील वाळूच्या ढिगाऱ्यावर योगासने करणार आहेत.
असा आहे योग्य दिनाचा इतिहास : 27 सप्टेंबर 2014 मध्ये यूएन जनरल असेंब्लीमधील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना मांडली होती. भारताने मंजूर केलेल्या मसुद्याला 177 देशांनी पाठिंबा दिला होता. योगाला सार्वत्रिक मान्यता आणि वाढत्या लोकप्रियतेसह, संयुक्त राष्ट्र संघाने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला.
हेही वाचा : International Yoga Day 2021 : जाणून घ्या 21 जूनलाच का साजरा केला जातो योग दिवस!