बेगुसराय : बिहारच्या बेगुसरायमध्ये पुन्हा एकदा पंचायतीने तालिबानी हुकूम काढला ( Inhuman Act In Begusarai ) आहे. चोरीच्या आरोपावरून एका तरुणाला पकडून गावकऱ्यांसमोर उठाबशा मारायला लावण्यात आल्या. एव्हड्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर पंचायतीने त्याला थुंकीही चाटायला भाग पाडले. हे प्रकरण बाखरी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनपूर गावातील आहे. पंचायतीच्या या निर्णयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत ( Theft In Begusarai ) आहे.
"तरुणासोबत झालेल्या या अमानुष कृत्याची कोणतीही लेखी माहिती पोलिस ठाण्याला मिळालेली नाही. या प्रकरणाबाबत इतर सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. कोणालाही असे कृत्य करण्याची परवानगी नाही. या प्रकरणात काहीही असो, लोक दोषी असतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल." - हिमांशू कुमार सिंग , बखरी पोलिस स्टेशन प्रभारी
तरुणावर चोरीचा आरोप : मोहनपूर गावात एका घरात चोरी करताना तरुणाला रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही लोकांनी पंचायत भारावली. त्यात पंचायतीचा अमानुष चेहरा पाहायला मिळाला. पंचायतीमध्ये आरोपीला शिक्षा देऊन नंतर थुंकी चाटायला लावण्यात आली. तेथे उपस्थित जनसमुदाय हा सर्व तमाशा पाहत राहिला. शिक्षा दिल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात न देता सोडून देण्यात आले. यादरम्यान काही लोक मोबाईलवरून व्हिडिओ बनवत होते, काही लोक फोटो काढत होते.
12 हजारांचा चोरीचा आरोप : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा बाखरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागवान पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. घरातुन 12 हजार रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप तरुणावर आहे. या निर्णयाबाबत सध्या स्थानिक पोलिसांना लेखी माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा : क्रूरतेचा कळस.. ६ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या.. चाकूने डोळे फोडून, जीभ कापली..