इंदूर - म्हणतात ना की विदवत्तेला वयाचे बंधन नसते. इंदुरचा वंडरबॉय अवि शर्मा या बालकाला पाहून या म्हणीचा प्रत्यय येतो. हा बालक मोटीव्हेशनल स्पीकर आहे. त्याने लहान वयातच लेखक, प्रेरणादायी वक्ता व वैदिक गणिताचा गुरु बनण्याचा गौरव मिळवला आहे. (12 years old wonder boy avi sharma) अवी शर्मा एक अँकर, अभिनेता आणि होस्ट सुद्धा आहे. अवीला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळाले आहेत. अवी शर्माला (Wonder Boy)वंडर बॉयच्या रुपात जगभरात ओळखले जाते.
अवी का आहे वंडर बॉय ? -
वय केवळ 12 वर्ष. ओळख एक प्रेरक वक्ता म्हणून. नाव अवी शर्मा. आज या नावाला देश व जगभरात कोणत्याही खास ओळखीची गरज नाही. अवी शर्मा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. या बालकाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही सामील आहे. अवीचा IQ 161 आहे. इतका IQ असणारी मुले जगात केवळ 2 टक्के आहेत. (host anchor motivational speaker ) अवी भारतात वंडर बॉयच्या रूपात प्रसिद्ध आहे. हा बालक मध्य प्रदेशातील इंदूर शहरात राहतो. अवी एक लेखक आहे, त्याचबरोबर वैदिक गणिताचा सर्वात युवा गुरू होण्याचा मान अवीच्या नावावर आहे. अवी सर्वात लहान वयाचा अँकर व अभिनेता आहे. ऑनलाइन मुलाखत शोचा सर्वात कमी वयाची होस्ट आहे. त्याचबरोबर मिशन संस्कार या संस्थेचा संस्थापक सुद्धा आहे अवी शर्मा.
दोन वर्षाच्या वयातच सर्वांना केले आश्चर्यचकीत -
म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. ज्या वयात मुले बोबडे बोलत असतात त्याच दोन वर्षाच्या वयात अवी श्लोक आणि मंत्रांचा उच्चारण करु लागला. अडीच वर्षाच्या होईपर्यंत अवीने जवळपास 200-300 हिंदी व इंग्रजी कविता पाठ केल्या. रंगांची ओळख, बँकांची नावे पाठ करणे त्याच्यासाठी डाव्य हाताचा खेळ झाला. अशा करामती मुलाची ओळख होणे कठीण नव्हते. त्याच्या आई-वडिलांनी आपल्या अद्भूत प्रतिभेच्या मुलाला आधीच ओळखले होते. आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने केवळ दोन वर्षाच्या वयातच अवीने स्टेजवर पहिले पाऊल ठेवले. (writer of baalmukhi ramayan) अवीने स्टेजवर आपल्या Performance ने सर्वांना आश्चर्यचकीत केले. त्यानंतर संपूर्ण देशाला त्याच्या बुद्धीची जाणीव झाली. अवी अनेक TV Shows व जाहिराती करू लागला. त्याने 4 लघु फिल्म आणि एका संगीत अल्बममध्येही काम केले आहे. भारतीय प्राचीन कथा, निंबध, ओलंपियाड, अँकरिंग व अन्य अनेक क्षेत्रात हा Wonder Boy सतत पुढे जात राहिला.
डझनभर राष्ट्रीय-आतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले -
अवीच्या नावावर 2 एक्सक्लूसिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. 2020 & 2021 मध्ये त्याला हे पुरस्कार मिळाले आहेत. अवीच्या नावावर 3 इंडिया बुक्स ऑफ़ रेकॉर्ड्सही आहे. अवी इंटरनॅशनल आयकॉन अवार्ड विजेता आहे. यूथ आयकॉन अवार्डनेही त्याला गौरवान्वित करण्यात आले आहे. OMG book of records मध्येही अवीचे नाव आहे. त्याचबरोबर अवी मालव रतन, इंदुरी रतनही राहिला आहे. अवीला नॅशनल एक्सलेंस अवार्ड, pride of India award सारखे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य सन्मान प्राप्त आहेत. नुकतेच त्याला UP चे CM योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही त्याचे पुस्तक बालमुखी रामायणसाठी प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे. अवीने अनेक ओलंपियाडमध्ये (Wonder Boy) आतापर्यंत 20 गोल्ड मेडल आणि एक सिल्व्हर मेडल मिळवली आहेत.
अवीने लिहिलेले बालमुखी रामायण -
10 वर्षाच्या वयात अवीने 250 छंदांमध्ये आपल्या शब्दात रामायण लिहिले आहे. (writer of baalmukhi ramayan). त्याने या पुस्तकाला "बालमुखी रामायण " असे नाव दिले. सर्वांना समजावे यासाठी अवीने हे पुस्तक साध्या व सोप्य हिंदी भाषेत लिहिले आहे. अवीने सांगितले की, कोरोना काळात हताश व निराश लोकांना प्रेरणा देण्यासाठी हे पुस्तक लिहिले. त्यानंतर संपूर्ण जगात Wonder Boy अवीच्या नावाचा डंका वाजू लागला. 60 हून अधिक मीडिया चॅनल्स व प्रसारमाध्यमांनी बालमुखी रामायणावर फीचर बनवले आहे.
वैदिक गणिताचा गुरू अवी -
अवीची ओळख वैदिक गणिताच्या गुरुच्या रुपातही आहे. कोरोना कालात त्याने जवळपास दीडशे विद्यार्थ्यांना वैदिक गणित मोफत शिकवले. यामध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांपासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अवी सध्या 12 वर्षाचा असून सातवीच्या वर्गात शिकत आहे, मात्र तो 12 वीच्या विद्यार्थ्यांनी गणितातील सूत्रे शिकवतो.
सेलेब्रिटी कॉर्नर विथ अवी -
अवी त्याचा ऑनलाइन इंटरव्यू शो CELEBRITY CORNER या नावाने चालवतो. आतापर्यंत त्याने 60 हून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्यांच्या मुलाखती अवीने घेतल्या आहेत ते समाजातील प्रसिद्ध लोक आहेत. ज्यांनी आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
IIM इंदुरचे संचालक डॉ. हिमांशु राय, एअरपोर्ट डायरेक्टर अर्यमा सन्याल, मोटू पतलू सीरीजचे निर्माते डॉ. हरविंदर मन्नकर आदिंची मुलाखत अवीने घेतली आहे. त्याचबरोबर अभिनेते पंकज बेरी आणि फिल्म व टीवी सीरियल निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचीही मुलाखत अवीने घेतली आहे. तसेच दूरदर्शनचे माजी संचालक मुकेश शर्मा, मिस आशिया, यूनिवर्स, अनेक गायक, लेखक आणि दुसऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती अवीने घेतल्या आहेत. अवी अनेक शाळांमध्ये Management व Motivational Speech देण्यासाठी जातो. अवीच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सुद्धा आहे. त्याने अनेक इंटरस्कूल स्पर्धा व फॅशन शो जिंकले आहेत.
हे ही वाचा - बाल 'चाणक्य' तबला वादानातून करून देतो भारतीय संस्कृतीची ओळख.. तबल्यातून काढतो अनेक 'ताल'
मोटिव्हेशनल स्पीकर -
अवी बाल कलाकार आणि लेखक होण्याबरोबरच एक प्रेरक वक्ताही आहे. मोटिवेशनल स्पीच देण्यासाठी अनेक स्कूल, कॉलेज व अन्य संस्था त्याला बोलावत असतात. अवी लोकांच्या नैतिक मूल्यांचा विकास व नेतृत्व क्षमता वाढवण्याचे काम करत आहे. विशेष करून अवी मुलांच्या विकासावर अधिक काम करणार असल्याचे सांगतो. नुकतेच त्याला "सेज ग्रुप ऑफ़ एज्युकेशन"ने Motivational speaker च्या रूपात आमंत्रित केले होते.
मिशन संस्कार या संस्थेचे संस्थापक -
अवी इतक्या छोट्या वयात "मिशन संस्कार" नावाची संस्था चालवत आहे. त्याच्या माध्यमातून तो मुलांमध्ये भारतीय संस्कृती, धर्म आणि पुराणिक कथांच्या माध्यमातून संस्कृतीविषयी प्रेम व जागरूकता निर्माण करत आहे. अवी देशातील मुलांना आपल्या गौरवशाली संस्कृतीविषयी माहिती देत असतो. अवीला वाटते की, देशातील लोकांमध्ये आपल्यातील आदर्शांना विकास व्हावा. लोक सकारात्मक राहतील जेणेकरून देशाचे भविष्य उज्ज्वल होईल.