ETV Bharat / bharat

'कॉम्प्युटर बाबा'च्या अवैध बांधकामावर जेसीबी; इंदूर प्रशासनाची कारवाई - Computer Baba News

अतिक्रमण केलेल्या जागेबाबत प्रशासनाने कॉम्प्युटर बाबाला दोन महिन्यांपूर्वी नोटीस दिली होती. आश्रमाकडून त्यावर कोणतेही उत्तर न आल्याने प्रशासनाने कारवाई करत तब्बल ४६ एकर जागा मोकळी केली आहे.

Indore District Administration today demolished an illegal construction belonging to Computer Baba
'कम्प्युटर बाबा'च्या अवैध बांधकामावर बुलडोजर; इंदूर प्रशासनाची कारवाई
author img

By

Published : Nov 8, 2020, 1:07 PM IST

भोपाळ : मध्य प्रदेशच्या इंदूरमधील प्रसिद्ध 'कॉम्प्युटर बाबा'च्या आश्रमावर कारवाई करण्यात आली आहे. या आश्रमाच्या अवैध बांधकामांवर इंदूर प्रशासनाने जेसीबी चालवले. याप्रकरणी प्रशासनाने कॉम्प्युटर बाबाला दोन महिन्यांपूर्वी नोटीस दिली होती. आश्रमाकडून त्यावर कोणतेही उत्तर न आल्याने प्रशासनाने कारवाई करत तब्बल ४६ एकर जागा मोकळी केली आहे.

'कॉम्प्युटर बाबा'च्या अवैध बांधकामावर जेसीबी

लोकतंत्र बचाओ यात्रा..

कॉम्प्युटर बाबाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी २८ जागांवर लोकतंत्र बचाओ यात्रेचे आयोजन केले होते. या सर्व ठिकाणी एक प्रकारे भाजपाचा विरोध करत या यात्रा काढण्यात आल्या होत्या. कमलनाथ सरकारच्या काळात कॉम्प्युटर बाबाने नर्मदा नदीसाठीही बऱ्याच मोहिमा राबवल्या होत्या.

'कम्प्युटर बाबा'च्या अवैध बांधकामावर जेसीबी

आणखी दोन ठिकाणी अतिक्रमण; बाबाला घेतले ताब्यात

कॉम्प्युटर बाबाच्या अंबिकापुरी येथील आश्रमाबाबतही प्रशासनाने त्यांना नोटीस दिली आहे. तसेच, सुपर कॉरिडॉरमधील वनविभागाच्या जागेवरही बाबाने अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. याठिकाणीही प्रशासन लवकरच कारवाई करणार आहे. या कारवाईस विरोध केल्यामुळे आश्रमाच्या सहा लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे. यामध्ये कॉम्प्युटर बाबाचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : 'पुलं'च्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची गुगलकडून दखल; जयंतीनिमित्त बनवलं खास डुडल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.