ETV Bharat / bharat

इंडिगोची वेबसाईटसह इतर ऑनलाईन सेवा बंद, जाणून घ्या कारण

Indigo Goes Offline : इंडिगोच्या ऑनलाइन सेवा देशभरात ठप्प झाल्यामुळं विमान कंपनीनं लोकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. अशातच इंडिगोकडून वेबसाईटसह अॅपवरील सेवा आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Indigo Goes Offline
Indigo Goes Offline
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 8:25 AM IST

हैदराबाद Indigo Goes Offline : इंडिगोच्या ऑनलाइन सेवा देशभरात ठप्प झाल्या आहेत. त्यामुळं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. ऑनलाइन प्रणाली बंद झाल्यामुळं प्रवाशांना विमानात कोणतेही बदल किंवा वेब-चेक करता आले नाहीत. विमान कंपनीची यंत्रणा ऑफलाईन झाल्यामुळं सकाळी त्याची साइट, अॅप आणि ग्राहक सेवा पूर्णपणे बंद झालीय. याविषयी इंडिगोनं सोशल मीडियात पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटलयं की, "आम्ही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ऑफलाइन आहोत. विमान उड्डाणाची स्थिती हवामानावर अवलंबून असेल."

प्रवाशांना ऑनलाइन स्थिती तपासण्यात अडचण : मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीला रात्री 11 वाजल्यानंतर सिस्टीम अपडेट सुरू झालं. त्यामुळं विमान कंपनीच्या सर्व ऑनलाइन सेवा अचानक ऑफलाइन झाल्या आहेत. यामुळं लोकांना नवीन तिकिटं बुक करता आली नाहीत. ज्या लोकांनी आधीच तिकीट बुक केलं होतं, त्यांना त्यांची स्थिती ऑनलाइन तपासता आली नाही. त्यांचं विमान उशीरा की वेळेवर आहे, याची माहिती त्यांना मिळू शकली नाही.

विमानतळांवर गोंधळाचं वातावरण : इंडिगो ऑफलाइन असल्यानं प्रवाशांना वेब-चेक करता आलं नाही. त्यामुळं विमानतळांवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दिल्ली विमानतळावर लोक माहितीसाठी भटकताना दिसले. विमान कंपनीच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळं सकाळी त्याची वेबसाइट, अॅप आणि ग्राहक सेवा पूर्णपणे बंद होती. विमानतळांवर ऑफलाईन काम केलं जात होतं. त्यांच्या विमानाची स्थिती जाणून घेण्यासाठी एअरलाइन्सच्या काउंटरवर लोकांची रांग लागली होती. काही ठिकाणी अनेक लोक एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांशी वाद घालतानाही दिसले.

मुंबईच्या धावपट्टीवर बसून जेवण : या सर्व प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत इंडिगोने प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. याआधी 15 जानेवारीला इंडिगोनं मुंबई विमानतळावर धावपट्टीवर बसलेल्या प्रवाशांना जेवण दिलं होतं. त्यावेळी या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. लोकांनीही सोशल मीडियावर एअरलाइनवर जोरदार टीका केली होती.

हेही वाचा :

  1. मुंबई विमानतळावर विमाने उभी करण्याच्या जागीच बसून जेवण; इंडिगोसह मुंबई विमानतळ प्रशासनाला नोटीस, कंपनीनं मागितली माफी
  2. विमानाला उशिर झाल्यानं संतापला प्रवासी, थेट पायलटलाच केली मारहाण
  3. दाट धुक्यामुळं मुंबईवरून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाचं ढाका विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.