ETV Bharat / bharat

भारताचा अभिमान : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका कोचीत तयार

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोचीनमधील कोचीन शिपयार्डला भेट दिली. या भेटीत त्यांनी विमानवाहू युद्धनौकेच्या कामाची पाहणी केली.

पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका कोचीत तयार

author img

By

Published : Jun 26, 2021, 5:19 PM IST

कोची - भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका समुद्रातील चाचणीसाठी तयार झाली आहे. देशाला सर्वाधिक प्रतिक्षा असलेल्या विमानवाहू युद्धनौकेचे काम शेवटच्या टप्प्यात कोचीन शीपयार्डमध्ये सुरू आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये यशस्वी बेसिन टेस्ट घेतल्यानंतर विमानवाहू युद्धनौका तयार झाली आहे. ही युद्धनौका बांधण्याचा आजपर्यंतचा सर्वाधिक कठीण प्रकल्प होता.

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका
स्वदेशी विमानवाहू युद्धनौका

हेही वाचा-आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकाने कोरोना तापसणीसाठी तयार केले टेस्टिंग टूल; डीजीसीआयने दिली मान्यता

ही आहेत युद्धनौकेची वैशिष्ट्ये

  • एकाचवेळी या युद्धनौकेत ३० लढाऊ विमाने बसू शकतात.
  • युद्धनौकेवर २,३०० कम्पार्टमेंटमध्ये वापरलेली केबल ही २,१०० किलोमीटरपर्यंत पसरू शकेल, इतकी लांब आहे.
  • युद्धनौका २६२ मीटर लांब आहे.
  • २८ सागरी मैल वेगाने (नॉटीकल मैल) युद्धनौका प्रवास करू शकते.
  • युद्धनौकेत १५०० नौदलाचे अधिकारी राहू शकतात.

हेही वाचा-शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन

युद्धनौका म्हणजे भारताचा अभिमान - केंद्रीय संरक्षण मंत्री

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोचीनमधील कोचीन शिपयार्डला भेट दिली. या भेटीत त्यांनी विमानवाहू युद्धनौकेच्या कामाची पाहणी केली. ही युद्धनौका पुढील वर्षात नौदलाच्या ताब्यात येणार आहे. या युद्धनौकेला आयएनएस विक्रांत असे नाव दिले जाणार आहे. ही युद्धनौका म्हणजे भारताचा अभिमान असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच ही युद्धनौका म्हणजे आत्मनिर्भर भारतचे तेजस्वी उदाहरण असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.