दिल्ली - डिआंद्रे आणि गुजरातमधील राजपिपला येथील भारतातील पहिला समलिंगी राजकुमार मानवेंद्र सिंग गोहिल ( gay prince Manvendra Singh ) हे दोघे गेली अनेक वर्षे एकत्र राहत होते. अनेक कार्यक्रमात त्यांना एकत्र पाहण्यात आले आहे. अनेकदा त्यांच्या विवाहाच्या चर्चा होत असत. अखेर या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि 6 जुलै 2022 रोजी कोलंबस, ओहायो येथील चर्चमध्ये या दोघांचा विवाह थाटात पार पडला.
सोशल मीडियावर विवाहाबद्दल वक्तव्य - डिआंद्रे यांनी सोशल मीडियावरून काही दिवसांपूर्वी ते दोघे विवाह करणार असल्याचे जाहीर केले होते. फोटोंची ही छायाचित्रे आणि व लग्नाचे प्रमाणपत्र पाहून अखेर त्यांच्या फॉलोअर्सना या दोघांच्या विवाहाची खात्री पटली. सोशल मीडियावर याची सध्या या विवाहाची खूप खमंग चर्चा रंगली आहे.
कोण आहे गे प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहिल? - 'गे' प्रिन्स मानवेंद्र सिंह गोहिल हा बहुधा देशातील पहिला असा राजकुमार आहे, ज्याने स्वतः 'गे' असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर केवळ गुजरातमध्येच नव्हे, तर आता देश-विदेशातही मानवेंद्र 'गे' प्रिन्स म्हणून ओळखला जात आहे. समलैंगिकांच्या हितासाठी ते काही ना काही काम करत राहतात. त्यांनी राजपिपला येथे समलैंगिकांसाठी वृद्धाश्रमही उभारला आहे. या आश्रमाला अमेरिकन लेखिका 'जेनेट' यांचे नाव देण्यात आले आहे. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील हा पहिला 'गे' आश्रम आहे. जेनेटने या आश्रमासाठी सर्वाधिक रक्कम दान केली होती.
2009 मध्ये सुचली कल्पना - मानवेंद्रच्या म्हणण्यानुसार, 'गे' आश्रम बांधण्याची कल्पना त्यांना 2009 मध्येच आली आणि तेव्हापासून ते त्यासाठी प्रयत्नशील होते. आश्रमाचे उद्घाटन जेनेटची बहीण कार्लाफाइन यांच्या हस्ते झाले. ती आपल्या पतीसोबत खास अमेरिकेहून इथे आली होती.
हेही वाचा - माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल