ETV Bharat / bharat

काबुलमधील भारतीय राजदुतांसह कर्मचाऱ्यांना मायदेशात आणणार, हवाईदलाचे सी-17 जामनगरला उतरले

author img

By

Published : Aug 17, 2021, 3:42 PM IST

Updated : Aug 17, 2021, 4:45 PM IST

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अफगाणिस्तानचा स्पेशल सेल सुरू केला आहे. या सेलमधून अफगाणिस्तानमधून भारतात येण्याची विनंती करणाऱ्या नागरिकांशी समन्वय करणे आणि अफगाणिस्तानशी संबंधित इतर कामे हा सेल करणार आहे.

भारतीय हवाईदलाचे विमान
भारतीय हवाईदलाचे विमान

हैदराबाद/काबुल - काबुलमधील भारतीय राजदुतांसह आणि भारती कर्मचाऱ्यांना तातडीने आणण्यात येणार असल्याचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बगाची यांनी सांगितले. अफगाणिस्तानमधील बदलणारी स्थिती पाहता काबुलमधील भारतीय राजदुतांना आणि भारतीय कर्मचाऱ्यांना भारतात तातडीने आणण्यात येणार आहे.

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर तेथील परिस्थिती बदलली आहे. जीवाच्या भीतीने अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील विविध प्रांतामध्ये अनेक भारतीय लोक अडकले आहेत. तर अनेक भारतीय हे काबुल विमानतळाजवळ तर काही जण विविध गुरुद्वारांमध्ये अडकले आहेत. भारतीय हवाईदलाचे सी-17 हे विशेष विमान हे भारतीय अधिकाऱ्यांना घेऊन गुजरातमधील जामनगर येथे पोहोचले.

काबूलवरून हवाईदलाचे विमान जामनगरमध्ये दाखल

हेही वाचा-काबुलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेची तालिबानने दिली ग्वाही- मनजिंदर सिंग सिरसा

अफगाणिस्तानने सुरू केला स्पेशल सेल

भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अफगाणिस्तानचा स्पेशल सेल सुरू केला आहे. या सेलमधून अफगाणिस्तानमधून भारतात येण्याची विनंती करणाऱ्या नागरिकांशी समन्वय करणे आणि अफगाणिस्तानशी संबंधित इतर कामे हा सेल करणार आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सेलची हेल्पलाईन +919717785379 आणि हा ई-मेल MEAHelpdeskIndia@gmail.com आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे ट्विट
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे ट्विट

हेही वाचा-उत्तराखंडच्या जंगलात आढळला देशातील पहिलाच दुर्मीळ 'आर्किड'

शीख आणि हिंदू समुदायांच्या प्रतिनिधींशी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संपर्कात-

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की अफगाणिस्तानमधील स्थितीवर भारत सरकार जवळून देखरेख करत आहे. अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू समुदायांच्या प्रतिनिधींशी सातत्याने संपर्कात आहोत. ज्यांना अफगाणिस्तान सोडायचा आहे, त्यांना भारतात येण्यासाठी सुविधा देण्याची ग्वाहीदेखील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे. अफगाणिस्तानमधील शैक्षणिक, सामाईक विकास आणि लोकांकडून लोकांना मदत होण्यासाठी भारताकडून विविध प्रोत्साहपर कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमात भागीदार असलेल्या व्यक्तींच्या पाठिशी आम्ही उभे राहणार आहोत.

हेही वाचा-मोदी सरकारने गाढ झोपेतून जागे व्हावे- अफगाणिस्तानमधील स्थितीवरून काँग्रेसची बोचरी टीका

अफगाणिस्तानमधील अनेक भारतीयांनी मायदेशात येण्यासाठी विनंती केली आहे. त्यांना एक किंवा दोन दिवसात भारतात आणण्यात येणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

तालिबानी नेत्यांनी दिली सुरक्षेची ग्वाही

काबुलमधील गुरुद्वारामध्ये गझनीमधील 50 हिंदू आणि 270 हून अधिक जलालबादमधील शीखांचा समावेश आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती बिघडल्याने त्यांना काबुलमधील कार्टे परवान या गुरुद्वारामध्ये आणण्यात आले आहे. तालबिानी नेत्यांनी त्यांची भेट घेऊन सुरक्षेची ग्वाही दिली आहे. अफगाणिस्तानात राजकीय आणि सैन्यदलामध्ये बदल होत असले तरी हिंदू आणि शीख लोकांच्या जीविताचे संरक्षण होईल, अशी आशा असल्याचे दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रमुख मनजिंदर सिंग म्हणाले.

120 भारतीयांना आणले सुरक्षित

सोमवारी रात्री भारताचे C-70 हे विमान 120 भारतीयांना घेऊन परत आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच अफगाणिस्तानचे काही खासदार आणि उच्चायुक्त सुद्धा भारतात पोहोचले. तेथे अडकलेल्या भारतीयांनी एक व्हीडीयो जारी केला आहे. यात एका कोपऱ्यात बसून तेथील भारतीय नागरिक अडचणीत आहेत. याआधी 129 भारतीयांना परत आणले आहे. "माझ्यासोबतच आणखी भारतीय आहेत. आम्ही बाहेर निघू शकत नाही. कारण, बाहेर गोळ्या झाडल्या जात आहेत. येथे चोर आणि लुटारूंची भीती आहे. भारताचे विमान कधी येणार आम्हाला काहीच पत्ता नाही. आम्हाला आधी दुपारी 12.30 ची वेळ देण्यात आली होती. आता दूतावासात कुणी फोन देखील उचलत नाही. आमच्याकडे कसलीही माहिती नाही. विमानतळाबाहेर 4 लाख लोक उभे आहेत. प्लीज आमची मदत करा अशा आशयाचा संदेश सोशल मिडीयावर टाकला आहे.

राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी पैसे घेऊन पळाले-

अफगाणिस्तानचे अमेरिका समर्थक राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडताना रिकाम्या हाताने गेले नसून 4 कार आणि एक हेलिकॉप्टर भरून पैसे घेऊन गेल्याचा धक्कादायक दावा रशियाच्या दूतावासाने केला आहे. रशियाची वृत्तसंस्था RIA ने दूतावासातील सूत्रांनी याबाबत माहिती दिली. पैसे जास्त असल्याने काही रक्कम ते विमानतळावरच सोडून गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा-... म्हणून तालिबानी दहशतवाद्यांसमोर अफगाणिस्तानच्या सैन्यदलाने मानली हार

Last Updated : Aug 17, 2021, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.