टोरंटो (कॅनडा) - कॅनडाच्या टोरंटो शहरामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident in Toronto) व्हॅन आणि ट्रॅक्टर ट्रेलर यांच्या जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
5 Indian students passed away in an auto accident near Toronto on Saturday, March 13. Two others in hospital. Team of Consulate General of India in Toronto in touch with friends of the victims for assistance: Ajay Bisaria, High Commissioner of India to Canada
— ANI (@ANI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">5 Indian students passed away in an auto accident near Toronto on Saturday, March 13. Two others in hospital. Team of Consulate General of India in Toronto in touch with friends of the victims for assistance: Ajay Bisaria, High Commissioner of India to Canada
— ANI (@ANI) March 14, 20225 Indian students passed away in an auto accident near Toronto on Saturday, March 13. Two others in hospital. Team of Consulate General of India in Toronto in touch with friends of the victims for assistance: Ajay Bisaria, High Commissioner of India to Canada
— ANI (@ANI) March 14, 2022
पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्या माहितीनुसार, हा अपघात रविवार (दि. 13 मार्च)रोजी झाला. टोरंटोजवळ झालेल्या या अपघातात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. (Indians students passed away In Toronto) तर, दोन जखमी आहेत. टोरंटोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाची टीम मदतीसाठी मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे.
-
Heart-breaking tragedy in Canada: 5 Indians students passed away in an auto accident near Toronto on Saturday. Two others in hospital. Deepest condolences to the families of the victims. @IndiainToronto team in touch with friends of the victims for assistance. @MEAIndia
— Ajay Bisaria (@Ajaybis) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Heart-breaking tragedy in Canada: 5 Indians students passed away in an auto accident near Toronto on Saturday. Two others in hospital. Deepest condolences to the families of the victims. @IndiainToronto team in touch with friends of the victims for assistance. @MEAIndia
— Ajay Bisaria (@Ajaybis) March 14, 2022Heart-breaking tragedy in Canada: 5 Indians students passed away in an auto accident near Toronto on Saturday. Two others in hospital. Deepest condolences to the families of the victims. @IndiainToronto team in touch with friends of the victims for assistance. @MEAIndia
— Ajay Bisaria (@Ajaybis) March 14, 2022
सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि मोंट्रेयल क्षेत्रातील आहे
हरप्रीत सिंह, जसपिंदर सिंह, करनपाल सिंह, मोहित चौहान आणि पवन कुमार अशी अपघातातील मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे मृत विद्यार्थी 21 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. सर्व मृत विद्यार्थी ग्रेटर टोरंटो आणि मोंट्रेयल क्षेत्रातील असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातही अपघाताचं सत्र
दरम्यान, तिकडे कॅनडामध्ये विद्यार्थ्यांचा अपघात झाला असताना, इकडे महाराष्ट्रात वारकरी-भक्तांचा अपघात झाला. पंढरपूरला वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी आहेत.
अपघातात 4 भाविक जखमी
तिकडे बुलढाण्याजवळ शेगावातही भीषण अपघात झाला. दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या बोलेरो गाडी आणि ट्रकच्या धडकेत 5 भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात 4 भाविक जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - Major Accident Buldana : शेगावला जाणाऱ्या बोलेरो गाडीला अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू