नवी दिल्ली : रविवारी होव्ह येथे भारत महिला विरुद्ध इंग्लंड महिला ( INDW vs ENGW ) संघात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. यातील पहिल्या सामन्यात स्मृती मंधाना (91), यस्तिका भाटिया (50) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ) (नाबाद 74) यांच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव ( Indian women team beat England by seven wickets ) केला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
-
Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A fine bowling performance from #TeamIndia as England finish at 227/7 👊
Over to our batters now to chase down the target 👍
Follow the game here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/Ob3F2lbyB0
">Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
A fine bowling performance from #TeamIndia as England finish at 227/7 👊
Over to our batters now to chase down the target 👍
Follow the game here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/Ob3F2lbyB0Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
A fine bowling performance from #TeamIndia as England finish at 227/7 👊
Over to our batters now to chase down the target 👍
Follow the game here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/Ob3F2lbyB0
भारतीय संघाला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य -
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 228 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे भारतीय संघाने 42.3 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून स्मृती मंधानाने ( Smriti Mandhana half century ) 99 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 91 धावांची शानदार खेळी केली. त्याचबरोबर यस्तिका भाटियानेही 47 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार 50 धावा केल्या. तसेच कर्णधार हरमनप्रीतने 94 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 74 धावांचे योगदान दिले.
-
Smriti Mandhana bags the Player of the Match award for her splendid 9⃣1⃣-run knock 👏👏
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A clinical run-chase from #TeamIndia to beat England by 7⃣ wickets and go 1-0 up in the series 👌
Full scorecard here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/7Fixwa4Ut2
">Smriti Mandhana bags the Player of the Match award for her splendid 9⃣1⃣-run knock 👏👏
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
A clinical run-chase from #TeamIndia to beat England by 7⃣ wickets and go 1-0 up in the series 👌
Full scorecard here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/7Fixwa4Ut2Smriti Mandhana bags the Player of the Match award for her splendid 9⃣1⃣-run knock 👏👏
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
A clinical run-chase from #TeamIndia to beat England by 7⃣ wickets and go 1-0 up in the series 👌
Full scorecard here 👉 https://t.co/x1UIAVe2e6#ENGvIND pic.twitter.com/7Fixwa4Ut2
तत्पूर्वी, अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने ( Fast bowler Jhulan Goswami ) तिच्या अंतिम आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात प्रभावशाली कामगिरी केली. परंतु खालच्या फळीतील फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे इंग्लंडच्या महिला संघाने सात बाद 227 धावा केल्या होत्या. भारताच्या 39 वर्षीय अनुभवी झुलनने 10 षटकांत केवळ 20 धावा देऊन एक विकेट घेतली. यादरम्यान तिने 42 डॉट बॉल टाकले (बॉलमध्ये धावा केल्या नाहीत). तिच्यासोबत दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी करत 33 धावांत दोन गडी बाद केले.
झुलन गोस्वामीची शानदार गोलंदाजी -
झुलनने आपल्या गोलंदाजीवर एकही चौकार किंवा षटकार मारु दिला नाही. तिने अनुभवी सलामीवीर टॅमी ब्युमॉन्ट ( Opener Tammy Beaumont ) (07) पायचित केले. तत्पुर्वी या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे सोपे नाही आणि चेंडू बॅटवर सहजासहजी येत नाही आणि अशा परिस्थितीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेगवान गोलंदाज मेघना सिंगने (आठ षटकात 42 धावांत 1 बळी) दुसरी सलामीवीर एम्मा लॅम्ब (12) याला यष्टिका भाटियाच्या एका लहान चेंडूवर झेलबाद केले. यानंतर झूलनसह दीप्ती आणि राजेश्वरी गायकवाड (40 धावांत 1 बळी) या दोन फिरकीपटूंनी धावगती रोखली.
तथापि, मेघना व्यतिरिक्त, स्नेह राणा (सहा षटकांत 45 धावांत 1 बळी) आणि पूजा वस्त्राकर (दोन षटकांत 20 धावांत एकही विकेट नाही) महागडे ठरले कारण यजमानांनी अखेरीस एकूण 220 धावा केल्या.
-
Captain @ImHarmanpreet brings up a fine half century in the run-chase #TeamIndia 205/3 in 41 overs - need 23 from 54 balls#ENGvIND pic.twitter.com/BAeM4jUCEr
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Captain @ImHarmanpreet brings up a fine half century in the run-chase #TeamIndia 205/3 in 41 overs - need 23 from 54 balls#ENGvIND pic.twitter.com/BAeM4jUCEr
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022Captain @ImHarmanpreet brings up a fine half century in the run-chase #TeamIndia 205/3 in 41 overs - need 23 from 54 balls#ENGvIND pic.twitter.com/BAeM4jUCEr
— BCCI Women (@BCCIWomen) September 18, 2022
इंग्लंडकडून डॅनी वॉट आणि एलिस डेव्हिडसनची अर्धशतके -
इंग्लंडकडून डॅनी वॉट ( Danny Watt ) (50 चेंडूत 43), एलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स (61 चेंडूत नाबाद 50) आणि सोफी एक्लेस्टोन (31) यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अखेर चार्ली डीनने 21 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. 34व्या षटकात इंग्लंडची धावसंख्या 6 बाद 128 अशी होती. त्यानंतर पण सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी 100 हून अधिक धावा जोडून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. त्यामुळे भारतीय संघ थोडा निराश होता.